डॉ. पाऊलबुधे विद्यालयात गणितं विज्ञान प्रदर्शन संपन्न
नगर -विविध विद्यालयात डिसेंबर महिन्यात गणित विज्ञान प्रदर्शने भरवली जातात. विद्यालयातील ही प्रदर्शने मुलांच्या ज्ञानाचा पाया अधिक सखोल करण्यासाठी त्यांच्या संकल्पना मजबूत करण्यासाठी संधी देतात. विविध आव्हानांना सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित होते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य गणित महामंडळाचे अध्यक्ष संजयकुमार निक्रड यांनी केले.
वसंत टेकडी जवळील डॉ. ना.ज.पाऊलबुधे माध्यमिक विद्यालयात शालेय गणित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री.निक्रड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध उपकरणाचे त्यांनी पाहणी करून कौतुक केले.
पुढे बोलताना त्यांनी विविध शास्त्रज्ञांचे प्रयोग त्यांचे असलेले विज्ञान प्रती योगदान याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्याना आपल्या भाषणातून दिली.जीवनात जिद्द चिकाटी परिश्रम असेल तर जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. असे ते म्हणाले.यावेळी महाराष्ट्र राज्य गणित महामंडळाचे कार्यकारणीवर विद्यालयाचे सहशिक्षक श्री. विष्णू मगर यांची निवड झाल्याबद्दल निक्रड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती सुरेखा नवले यांची नगर शहर विज्ञान शिक्षक संघटनेच्या कार्यकारणी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे विद्यालयाचे वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत बिडवे म्हणाले विज्ञान विषय हा नेहमीच शिकण्याचा कुतूहलाचा आणि प्रयोगाचा असतो. आजपर्यंत आपण फक्त ऐकत आलो झाडे लावा, झाडे जगवा झाडे आपल्याला प्राणवायु देतात हे खरे परंतु तो प्राणवायू आपल्याला कसा उपलब्ध होतो, त्यासाठी झाडे काय करतात.आपल्याला ऑक्सिजन कसा मिळतो. असे प्रश्न आपल्याला पडतात.
विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामधुन झाडे लावण्याचे महत्त्व विशद करून अभ्यास पूर्ण प्रकल्प सादर करून सुंदर सादरीकरण केले. हा विद्यालयाच्या वतीने महत्त्वाचा विषय असून त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. विज्ञान प्रदर्शनांचा अभ्यासावर आणि विकासावर मोठा प्रभाव पडतो.असे ते म्हणाले.
यावेळी विद्यालयातील शिक्षक रोहिदास चौरे,शिक्षिका जयश्री केदार, वैशाली शिर्के, वैशाली वाघुले शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक परदेशी यांनी केले तर आभार प्रा.आशा गावडे यांनी मानले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com