प्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन
वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
जगातील सर्वोत्तम तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे.अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हुसैन 73 वर्षांचे होते.झाकीर हुसैन यांच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार सुरु होते.
संगीत क्षेत्रातील ऑस्कर मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारांसाठी झाकीर यांना सातवेळा नामांकन मिळालं होतं. यापैकी चार वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.
2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला होता. त्यावेळी त्यांना 'ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट'साठी हा पुरस्कार देण्यात आला होता. 2024 मध्ये झालेल्या 66 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये त्यांना तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते.
बेस्ट कंटेम्पररी इंस्ट्रुमेंटल अल्बम कॅटेगरीत 'ॲज वी स्पीक'साठी, बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटेगरीत 'दिस मोमेंट' आणि बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स कॅटेगरीत 'पश्तो'साठी त्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने झाकीर हुसैन यांना गौरविण्यात आलं होतं.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com