नगर-पोलीस स्थापना दिनानिमित्त नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजलेल्या कार्यक्रमासआज आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली व विविध विभागांची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांना शस्त्र प्रदर्शन व हाताळणी कशी करायची हे शिकवण्यात आले. विविध प्रकारचे वेपन अश्रुधूर नळकांडी यांची माहिती देण्यात आली व असे शस्त्र कुठे आढळून आल्यास काय करायचे ते कसे हाताळायचे याची माहिती देऊन आपत्तीकालीन नंबरला किंवा पोलिसांना कळवावे असे सांगण्यात आले.
या दरम्यान पोलीस अधीक्षकांनी राकेश ओला यांनी मुलांशी संवाद साधला व मुलांना सांगितलेली माहिती किती अवगत झाली यासाठी त्यांना विविध शस्त्राची नावे विचारली ती मुलांनी व मुलींनी बिनचूक सांगितली याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले
या प्रदर्शनातून आम्हाला खूप माहिती मिळाली व भरपूर शिकायला मिळाले असे विद्यार्थ्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कुळधरण सर्व पल्लवी तांबे विद्यार्थ्यांबरोबर उपस्थित होते
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com