सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर यांची बिनविरोध निवड
अ.नगर- दर्शक :
"महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर,जालना यांची निवड करण्यात आली आहे." अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषदेची बैठक राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडली, या बैठकीत कवयित्री शर्मिला गोसावी यांनी डॉ.संजीवनी तडेगावकर यांचे नाव सुचवले तर त्यास कवयित्री स्वाती ठुबे यांनी अनुमोदन दिले व सर्वांनुमते त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
फेब्रुवारी २०२५ मध्ये नगर येथे होणाऱ्या सोळाव्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर या 'आशयघन' मराठी वाडमयीन त्रैमासिकाच्या संपादक असून अनुभव प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाच्या त्या सदस्या होत्या. मराठवाडा साहित्य परिषदेच्या संचालक असून प्रतिष्ठान मासिक संपादक मंडळाच्या सदस्या म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
फुटवे,अरूंद दारातून बाहेर पडताना,संदर्भासहित हे 3 कवितासंग्रह तर चिंगूर ललितलेखसंग्रह, पापुद्रे मुलाखत संग्रह, आणि झरे मोकळे झाले समीक्षाग्रंथ, यासह एक होती सारा हे अनुवाद पुस्तक प्रकाशित झालेले आहे. दै. दिव्य मराठी, दै. लोकमत मध्ये त्यांनी 'ती'ची कविता व मराठवाड्याची कविता हे काव्यसमीक्षा सदरलेखन लिहिलेली असून त्या 6 वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन जालना व 37 वे मराठवाडा साहित्य संमेलन, जालना चे कार्यवाह म्हणून कार्यरत होत्या. आत्ता पर्यंत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ:मय निर्मिती चा इंदिरा संत पुरस्कार, प्रसाद बन पुरस्कार, भि. ग.रोहमारे ग्रामीण काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कारा , दक्षिण महाराष्ट्र साहित्यसभेचा रत्नाकर धम्मपाल पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह विविध नामांकित सस्थेचे 23 पुरस्कार मिळालेले आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ ,सयाजीराव गायकवाड विद्यापीठ,बडोदाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जागतिक मराठी अकादमी साहित्य संमेलन, गोवा काव्य होत्र राष्ट्रीय कवी संमेलन,महाराष्ट्र शासनाचा ग्रंथ महोत्सव, मराठी साहित्य संमेलन, इंदोर, मराठवाडा लेखिका संमेलन यासह विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये त्या सातत्याने सहभागी होत आहेत. त्यांच्या आकाशवाणीवर मुलाखती झालेल्या असून एक कवी एक कवयित्री अंतर्गत मसाप,पुणे येथे विशेष मुलाखत झालेली आहे. त्याच बरोबर अक्षरयात्री ग्रामीण साहित्य संमेलन वीटा सांगली, तिसरे झेप साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा साहित्य परिषदेचे शिक्षक संमेलन उदगीर, लोकसंवाद साहित्य संमेलन नायगाव नांदेड येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मकरंद अनासपुरे निर्मित अभिनित मुक्काम पोस्ट कोळसेवाडी या वेब सिरीज मध्ये त्यांनी आईची भूमिका केलेली आहे. तडेगावकरांच्या निवडक कवितेवर आधारित उत्कर्ष थिएटर निर्मित ' जागर कवितेचा ' हा साभिनय संगीतमय कार्यक्रम सादर होत असतो.
कवयित्री संजीवनी तडेगावकर यांची सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, कार्यवाह भारत गाडेकर, राज्य संघटक प्रा. डॉ.अशोक कानडे,उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, संस्थापक सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, संयोजन समिती प्रमुख बबनराव गिरी, मार्गदर्शक माजी आमदार, कवी लहू कानडे, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे ,प्रा.डॉ.शंकर चव्हाण, प्रमोद देशपांडे, माजी प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी अभिनंदन केले आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com