अॅड. सुद्रिक यांचे वैदयकिय विदयार्थ्यांसाठी व्याख्यान
नगर - अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि रूग्णालय मनमाड रोड, सावेडी, येथील फौजदारीतील ख्यातनाम वकील अॅड. सतिशचंद्र व्ही सुदिक यांना न्याय वैदयक शास्त्र या विषयावर वैदयकिय शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांनसाठी प्राचार्य डॉ. श्री. सुनिल पवार यांनी व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. नुकतेच त्यांचे व्याख्यान संपन्न झाले
सदर व्याख्यानात अॅड. मुद्रिक यांनी विस्तृत पणे बर्न, स्ट्रॅन्ग्यूलेशन, हॅगींग, पॉयझनिंग, थ्रोटलिंग, ड्रॉऊनिंग, ड्रायड्राऊनिंग, प्युट्रिफिकेशन, डिकॉम्पोझीशन, मृत्युचा वेळ, मृत्युपुर्व जवाव नोंदताना डॉक्टरची कर्तव्य इ. विषयांवर कथन केले वरील गोष्टींचा विदयार्थ्यां ना त्यांच्या भावी आयुष्यात कायम स्वरूपी उपयोग होईल,
तसेच रूग्णाचा केस पेपर हा नेहमी काळजीपुर्वक तयार करावा कारण एखादा रूग्ण न्यायालयात अथवा ग्राहकमंचात डॉक्टरांच्या विरोधात गेल्यास तोच केस पेपर त्यांना वाचवू शकतो, केस पेपर व्यवस्थीत नसेल तर वकीलही डॉक्टरांना मदत करू शकत नाहीत .
तसेच संस्थेतर्फे विदयार्थ्यांना प्रत्यक्ष न्यायालयात कामकाज पाहण्यास पाठविणे, तसेच शवविच्छेदन करतानाचे निरीक्षण करण्यास पाठवणे तसेच नाशिक येथील प्रयोगशाळेतील रासायनिक पृथककरण कसे करतात याचे निरीक्षणासाठी पाठवतात या बद्दल अॅड सुद्रिक यांनी समाधान व्यक्त केले व भविष्यामध्ये परिपुर्ण डॉक्टर कसे होतील या बद्दल संस्था घेत असलेल्या परिश्रमावद्दल कौतुक केले .
x

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com