डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय,समता बंधुता, या मूल्यांची शिकवण दिली- बाबासाहेब धिवर
नगर : दर्शक ।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारताचे दिशा दर्शक होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण जगाला हे दाखवून दिले की कठोर परिश्रम, शिक्षण आणि दृढ संकल्प यांच्या बळावर कोणीही मोठे कार्य करू शकतो. गरीब व वंचित समाजासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि सामाजिक न्याय, समता व बंधुता या मूल्यांची शिकवण दिली, असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर यांनी केले.
कौंडगाव जाब येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांचे भाषणे झाले.
Koudgao | महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून प्रभात फेरी विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळी डी. जे. ला फाटा देऊन गावातून महापुरुषांच्या नावाने घोषणा देत प्रभार फेरी काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य , ट्रॉफी देण्यात आले. यावेळी सरपंच लखन खरशे, उपसरपंच महेश शेडाळे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोंडके, जि. प.सदस्य बाबापाटील खर्शे ,बापू वयसे यांनी शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.जयंती साजरी करण्यासाठी बाबा ग्रुपचे अध्यक्ष जालिंदर पाटोळे ,उपाध्यक्ष आनंद धीवर, संतोष धीवर, शुभम पाटोळे, प्रशांत धीवर, सचिन पाटोळे, तेजेस धीवर, तसेच बाबा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी दिलेली जबदारी पार पाडली त्यावेळी महिलांनी हि मोठ्या उच्छाहात सहभाग घेतला.
धिवर पुढे बोलताना म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे अत्यंत विद्वान होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधूनही शिक्षण पूर्ण केले. त्यांनी भारताच्या संविधानाच्या निर्मितीत मोलाचा वाटा उचलला. आज आपण ज्या लोकशाहीत मुक्तपणे विचार मांडू शकतो, ते हक्क आपल्याला त्यांच्या दूरदृष्टीमुळे मिळाले आहेत.
यावेळी कौंडगाव येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले , मा जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, माता रमाई आदी महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून त्यांच्या जीवनावरील आधारित भाषणे सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम पाटोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष धिवर ,सचिन पाटोळे यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
x
%20(1).webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com