Nagar Court | नायब तहसिलदार क्षीरसागर : भ्रष्टाचार प्रकरणी आरोप ठेवण्यापुर्वीच दोष मुक्त

  Nagar Court | नायब तहसिलदार क्षीरसागर : भ्रष्टाचार प्रकरणी आरोप ठेवण्यापुर्वीच दोष मुक्त

नायब तहसिलदार क्षीरसागर : भ्रष्टाचार प्रकरणी आरोप ठेवण्यापुर्वीच दोष मुक्त






नगर:- 

दि. 30/10/2010 रोजी फटाका विक्री तात्पुरता परवाना काढण्यासाठी 56 व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये या प्रमाणे रुपये एक लाख बारा हजार स्वतःसाठी व वरिष्ठ अधिका-यांसाठी स्विकारले म्हणून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 अन्वये गुन्हा दाखल झाला त्याहुन त्यांचे विरुध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात वरीष्ठ अधिकारी यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये आवश्यक असलेली पुर्व मंजूरी नाकारण्यात आली होती त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी नगर न्यायालयातदोष मुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला असता तो यापुर्वीच मंजुर करण्यात आला होता.






       सदर प्रकरणात आरोपी श्री. जिवन पांडुरंग क्षिरसागर तत्कालीन नायब तहसिलदार यांचे विरुध्द दाखल असलेल्या भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम चे कलम 7, 13 (1) (ड) सह 13 (2) व भा. द. वि. 109 अन्वये गुन्हा दाखल होऊन आरोप पत्र दाखल केले असता त्यात न्यायालयात श्री. क्षिरसागर यांना आरोप ठेवण्यापुर्वीच दोषमुक्त करण्यात यावे म्हणून अर्ज दाखल करण्यात आला 




 त्यात शासकिय निर्णय दि.03 एप्रिल 2000 अन्वये पारीत केलेला दाखल करण्यात आला व न्यायालयास विनंती करण्यात आले की, त्या शासन निर्णया प्रमाणे "जेंव्हा एखा‌द्या प्रकरणामध्ये एका पेक्षा अधिक दर्जाचे अधिकारी व कर्मचारी गुंतले असल्याचा निष्कर्ष लाचलुचपत प्रतिबंध विभागाने काढलेला असतो त्यावेळी या प्रकरणात गुंतलेल्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांना समान न्यायाचे तत्व लागू करावे.




म्हणजेच वरीष्ठ अधिकाऱ्यावर खटला भरण्यास मंजुरी देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याने तशी मंजुरी दिल्याशिवाय कनिष्ठ अधिकारी / कर्मचारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येवू नये आणि जर वरिष्ठम अधिकाऱ्यावर खटला भरण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने अनुमती नाकारली तर त्या प्रकरणातील इतर कनिष्ठ अधिकारी/कर्मचारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, 


सदरचा शासन निर्णय व त्या आधारे केलेला दोष मुक्तीचा अर्ज व केलेल्या युक्तीवादाहुन जिल्हा न्यायालयाने श्री. जीवन पांडुरंग क्षिरसागर यांना आरोप निश्चितीपुर्वीच दोष मुक्त करावे हा अर्ज मंजूर करण्यात आला व आरोप निश्चितीपुर्वीच त्यांना नुकतेच दोष मुक्त करण्यात आले. श्री. जिवन क्षिरसागर यांचे तर्फे अॅड. सतिशचंद्र वि.सुद्रीक यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या