Saiban Nagar | साईबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये रोज शालेय सहली

  Saiban Nagar | साईबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये रोज शालेय सहली 

साईबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये रोज शालेय सहली




नगर : दर्शक । 

       साधारणतः नोव्हेंबर  महिन्यातशाळांच्या सहली सुरु होतात त्या फेबुवारी मध्यापर्यंत चालतात. सध्या शिर्डी रोडवरील नागापूर एमआयडीसी च्या मागे असणाऱ्या साईबन मध्ये रोज अनेक शाळांच्या सहली येत आहेशाळेच्या सहली व हुरडा यामुळे  मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी होत आहे 






          या शैक्षणिक सहली म्हणजे एक शालेय उपक्रमच होय.पूर्वी शालेय संस्था या फक्त शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे असणा-या स्थळांना,विद्यार्थ्यांना घेऊन जायचे जसे की,वैज्ञानिक अभ्यास केंद्रेवाचनालयेपरंतु आता ऐतिहासिक स्थळे,प्रेक्षणिय स्थळे,गडकिल्लेसमुद्रकिनारे,विविध संग्रहालयेकारखाने अशा विविध स्थळांवर नेल्या जातात.सध्या हा ट्रेंड सुद्धा बदलताना दिसत आहे.




महाविद्यालयांच्या धर्तीवर शाळांच्या सहली वॉटर पार्कसमुद्रकिनारी अशा ठिकाणी काढल्या जातात,हा बदलता ट्रेंड पर्यटनवाढीसाठी उपयुक्त ठरत आहे  अशा शैक्षणिक सहली काढण्यामागे शालेय संस्थेचा एकच उद्देश असतोतो म्हणजे मुलांच्या अभ्यासात आणि बुद्धीत आणखी भर पाडणे




                नगर,पुणे औरंगाबादबीड,मराठवाडानाशिक,ठाणे  जिल्हातील शाळेच्या सहली दरवर्षी मोठ्या प्रमाणात साईबन ला येतात व पूर्वीचे खडकाळ माळरानाचे फोटो पाहून व माहिती वाचून सध्या दिसणारा हिरवा परिसर पाहून येणाऱ्या पर्यटकांच्या तोडून शब्द बाहेर पडतो साईबन म्हणजे माळरानाला पडलेलं हिरवं स्वप्न आहे.झालेला हा बदल पाहून निसर्गबद्दल आत्मीयतानिर्माण होते 




      इथं तलाव,बोटिंग,लहान मुलांसाठी पपेट शो,बैलगाडी सफर,धबधबे व कारंजे,प्राणी व पक्षीहुरडा पार्टी,वनभोजन,रवींंद्र कलानिकेतन व हिरवळीवरील खुले नाट्यगृह,घसरगुंडी,झोके,जंगलजीम, ट्रेकींग,बर्डपार्क आदी सुविधा तेथे आहे.कृषी पर्यावरण आणि पर्यटनाबाबत पायाभूत सोई,सुविधा निर्माण करण्यात आल्या.त्यातून कृषीपर्यावरण आणि पर्यटन विकसीत होत गेलं. 

        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या