श्री साई स्कूलचा स्काऊट गाईड कॅम्प अंतरवली येथे उत्साहात संपन्न
श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा स्काऊट गाईड कॅम्प अंतरवली या ठिकाणी सहा व सात तारखेला उत्साहात व शिस्तबद्धतेत संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या कॅम्पचे उद्घाटन नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल भैय्या शेख, तस्मैया शेख, संजय चव्हाण,
स्काऊट गाईड मार्गदर्शक विकास लोखंडे, संस्थेचे अध्यक्ष अशोक कानडे, सचिव सुनिता कानडे, प्राचार्या शितल गायकवाड, एज्युकेशन डायरेक्टर तनुजा लोंढे, क्रीडा शिक्षक प्रसाद पाटोळे, संजय गायकवाड, मंदा तायडे, ज्येष्ठ शिक्षिका स्नेहल महाजन, प्रज्ञा भागवत व इतर शिक्षक वृंद पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अब्दुल भैया शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, अशा स्काऊट गाईड त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, जबाबदारीची भावना दृढ होते . आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान विद्यार्थ्यांना या शालेय कॅम्पाच्या माध्यमातून मिळत असते. यातून व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व आकाराला येत असते.
यावेळी संजय चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विनोदातून सामाजिक जाणवेची पायाभरणी करणारे मार्गदर्शन केले. विद्यार्थी चव्हाण सरांचा व्याख्यान ऐकताना मंत्रमुग्ध झाले होते. दोन दिवस चाललेले या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
कॅम्प दरम्यान साहसी खेळ,तंबू बांधणे, प्राथमिक उपचार प्रशिक्षण, शिस्तबद्ध संचलन, टीमवर्क वाढवणारे उपक्रम घेण्यात आले.रात्रीच्या शिबीरात देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी आपली कला व कल्पकता सादर केली.विद्यार्थ्यांची स्वच्छता अभियान पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com