एम.डी. रेडिओलॉजी परीक्षेत डॉक्टर श्रावणी शिंदे हिचे उज्वल यश
नगर : दर्शक
नुकत्याच झालेल्या एम.डी. (रेडिओलॉजी) या अत्यंत प्रतिष्ठित व कठीण मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय परीक्षेत डॉक्टर श्रावणी हिने घवघवीत यश संपादन केले आहे.
श्रावणी हिने आपले एम.बी.बी.एस. शिक्षण बी जे या पुण्यातील शासकीय महाविद्यालय येथून पूर्ण केले असून त्यानंतर एम.डी. रेडिओलॉजीसाठी नामांकित भारती विद्यापीठात कठोर परिश्रम घेतले. सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे.
यापूर्वीदेखील तिने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये, १० वी, १२ वी, नीट यूजी व नीट पीजी परीक्षांमध्ये लक्षणीय यश मिळवलेले आहे.
श्रावणी ही अहिल्यानगर येथील किर्लोस्कर फेरस कंपनीचे प्लांट हेड चैतन्य शिंदे आणि मृणाल शिंदे यांची कन्या आहे.
या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात ती एक उत्कृष्ट रेडिओलॉजिस्ट म्हणून सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान देईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com