वीज तांत्रिक संस्थेने ३१ वर्षाच्या सहकारी क्षेत्रात आदर्श कारभाराचा मापदंड निर्माण केला - आमदार संग्राम जगताप
नगर : दर्शक ।
सभासद हा संस्थेचा महत्त्वाचा भाग असतो. त्यांना सेवा देणे व विश्वास कायम टिकून ठेवणे ही यशस्वी जबाबदारी आम्ही सर्व संचालक यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. वीज तांत्रिक संस्थेने हेच तत्त्व प्रत्यक्ष अंमलात आणून विश्वसनीयता प्राप्त केली आहे. संस्थापक अध्यक्ष शिरीष गायकवाड साहेब व त्यांच्या सहकारी यांच्या सारख्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने शिस्त आणि प्रामाणिकपणा यातून संस्थेची प्रगती साधली. संस्थापक संचालक हेच खऱ्या अर्थाने अहिल्यानगरचे संस्थेचे केंद्रबिदू आहेत. संस्थेने आपल्या ३१ वर्षाच्या सहकारी क्षेत्रात आदर्श, कारभाराचा मापदंड निर्माण केला आहे, असे प्रतिपादन शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केले.
वीज तांत्रिक कामगार सहकारी संस्थेच्या सारसनगर मार्केट यार्ड, मागील परिसरामध्ये 31 वर्षाच्या तपश्चर्येतून सहकार क्षेत्रात "तांत्रिक सावली"अशा वास्तूचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते व संस्थेचे चेअरमन कुशाबा वायसे, अभयजी आगरकर, शिरीष गायकवाड, अविनाश घुले, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, माणिक विधाते, राम पानमळकर, बंटी गुंजाळ, दत्ता गाडळकर, बाबासाहेब डाके साहेब, शाम गुलाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी संस्थेचे तज्ञ संचालक प्रवीण जठार, व्हाईस चेअरमन श्रीमती. सुनिता मेढे, मानद सचिव अशोक मते, संचालक सतीश भुजबळ, संतोष शेलार, आशिष वेळापुरे, चंद्रकांत सुरवसे, संतोष भिंगारदिवे, अरविंद पाठक, अरुण भोसले, प्रवीण देशमुख, रूपेश चाकने, सचिन सुडके, संचालक मंडळ उपस्थित होते.
यांच्यासह तांत्रिक कामगार युनियन ५०५९ सरचिटणीस प्रकाश लहाने केंद्रीय पदाधिकारी दत्तू भोईर, प्रकाश निकम, अनिल सरोदे व अहिल्यानगर सर्कल मधील पदाधिकारी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
स्वागत पर भाषणात संस्थेचे संचालक पॅनल प्रमुख सतीश भुजबळ म्हणाले की, मार्च 2022 मध्ये स्वाभिमानी तांत्रिक पॅनल हा बहुमताने निवडून आल्यावर आपल्या संस्थेला 31 वर्ष यशस्वी वाटचाल चालली आहे. तरी सध्या संस्थेला दरवर्षी 3,50,000/- भाडे द्यावे लागत आहे, त्यामुळे संस्थेचे स्व. मालकीचे कार्यालय शहरात हवे जिथे की वीज तांत्रिक कामगारांना आधुनिक सुविधावर भर दिला जाईल.
जलद अचूक सेवा मिळण्यासाठी संचालक मंडळांनी सॉफ्टवेअर अपग्रिटेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे सदर अपग्रिटेशन लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. जागतिक दर्जाच्या सुविधेमुळे सभासदांना व्यवहार करणे अधिक सुलभ होणार आहे.
आमदार संग्राम भैय्या जगताप पुढे बोलताना म्हणाले की, संस्थेच्या नव्या इमारतीत आधुनिक सुविधा, कार्यक्षम सेवा आणि डिजिटल प्रक्रिया यांचा समावेश होणार आहे. सभासदांना जलद, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी संस्था सक्षम होणे आजची गरज आहे. या कार्यालयामध्ये वीज तांत्रिक कामगारांचा आत्मविश्वास वाढेल आणि शहरातील कामगार वर्गासाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरेल.
चेअरमन कुशाबा वायसे म्हणाले की, पतसंस्था स्थापने पासून नफ्यात असून संस्थेकडे मार्च 2025 अखेर. 12 कोटी रुपयांच्या ठेवी असून, 24 कोटीचे कर्ज वितरण आहे. ठेवीवर अधिकाधिक व्याज आणि कर्जावर कमीत कमी व्याजदर असे धोरण राबवून संस्था सभासदांना सेवा देत आहे. आधुनिक तंत्रज्ञाचा पुरेपूर वापर करण्याबाबत कायम भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
आभार व्यक्त करताना आशिष वेळापुरे म्हणाले की संस्था यापुढील काळात सभासदांना नेहमीच सर्वोत्तम व पारदर्शक सेवा देण्यावर भर दिला आहे. विश्वसनीयता व शिस्तबद्धता असल्याने स्वाभिमानी तांत्रिक पॅनल प्रमुख सतीश भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने सभासदांच्या संकटाच्या काळात चालना देण्यात योगदान दिले आहे. आणखी चांगली सेवा सभासदांना देईल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर जारकड यांनी केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com