Pragat Highschool Nagar | प्रगत विद्यालयाचा अर्जुन मडके राज्यस्तरीय क्रिकेट संघात
नगर - येथील दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता अकरावी वाणिज्यमध्ये शिकणारा चि. अर्जुन दादासाहेब मडके याने 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या विभागीय क्रिकेट निवड चाचणीमध्ये अव्वल क्रमांक पटकावत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. उत्कृष्ट क्रीडाप्रदर्शन, सातत्यपूर्ण मेहनत आणि खेळाची जाण याच्या जोरावर अर्जुनने राज्य पातळीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
अर्जुनच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्याचा उत्साहवर्धक सत्कार करण्यात आला. संस्थेचे सेक्रेटरी किरण वैकर आणि विद्यालयाचे प्राचार्य सुनिल पंडित यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला. यावेळी मुख्याध्यापक सुभाष येवले, सहाय्यक फौजदार बाळासाहेब पोकळे, पोलीस हवालदार सचिन कोळेकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
अर्जुन मडके यांचे संस्थेचे अध्यक्ष विजया रेखे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, सेक्रेटरी किरण वैकर, खजिनदार व प्रगत विद्यालयाचे चेअरमन उमेश रेखे, कार्यकारिणी सदस्य उदयकुमार भणगे, ॲड. उमेश नगरकर, संस्थेचे माजी अध्यक्ष दि. ना. जोशी, विद्यालयाचे प्राचार्य सुनिल पंडित, हर्षाली देशमुख, दिलीप रोकडे, गौतम कराळे आदींनी अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
अर्जुनच्या कामगिरीमुळे प्रगत विद्यालयाचा लौकिक पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, संस्थेच्या क्रीडाक्षेत्रातील प्रगतीशील दृष्टिकोनाचीही पुनर्प्रतिपादन झाली आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com