हॅपी मॉर्निंग ग्रुपचे शैलेश गांधी जैन ओसवाल पतसंस्थेचे उपाध्यक्ष
नगर : दर्शक ।
शहरातील नगर क्लब येथे नियमितपणे सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवणाऱ्या प्रसिद्ध हॅपी मॉर्निंग ग्रुपचे सक्रिय सदस्य शैलेश गांधी यांची शहरातील अग्रगण्य आणि प्रतिष्ठित जैन ओसवाल पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
श्री गांधी हे त्यांच्या समाजाभिमुख कार्यासाठी, लोकाभिमुख दृष्टीकोनासाठी आणि उपक्रमशील नेतृत्वासाठी ओळखले जातात. स्वतःचा व्यवसाय सांभाळत असतानाही अनेक सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी ते सातत्याने करतात. वाणिज्य शाखेचे स्कॉलर असलेले गांधी यांनी अनेक वर्षांत केलेल्या सामाजिक कामांमधून दिसून आलेल्या व्यवस्थापनकौशल्यावर व नेतृत्वगुणांवर संचालक मंडळाचा विश्वास बसल्याने ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली.
निवडीची घोषणा होताच हॅपी मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. “आपल्यातील सुयोग्य व्यक्ती योग्य पदावर विराजमान होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थेचे माजी चेअरमन किरण शिंगी, समीर बोरा, तसेच हॅपी मॉर्निंग ग्रुपचे डॉ. नीरज गांधी, निलेश मेहेर, पवन कटारिया, निलेश गांधी, कपिल बोरा, विक्रम मुथा, प्रसन्न खाजगीवाले, हर्षद गांधी, राकेश मेहतानी, मनीष मुनोत, आनंद कोठारी, सचिन कटारिया, हितेश गुप्ता यांनी गांधी यांच्या निवडीचे स्वागत केले.
तसेच महेश नागरी पतसंस्थेचे संचालक पवन गुंदेचा, ग्राहक भंडारचे संचालक सचिन डागा, आणि इतर मान्यवर सदस्यांनीही त्यांच्या नेतृत्वगुण, जोखीम व्यवस्थापन कौशल्य व ग्राहकाभिमुख दृष्टिकोनामुळे पतसंस्थेचे कार्य अधिक सशक्त होईल असा विश्वास व्यक्त केला.
शेवटी सर्वांनी शैलेश गांधी यांना उपाध्यक्षपदाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com