Snehalay | साधनाताई आणि बाबा आमटे पुनर्वसन संकुलाचे स्नेहालयात लोकार्पण
नगर : दर्शक ।
वंचितांसाठी स्नेहालय संस्थेत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मयोगिनी साधनाताई आणि महामानव बाबा आमटे भवनाचे येत्या मंगळवारी 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्नेहालय संस्थेत लोकार्पण होत आहे.
गेली 5 दशके समस्याग्रस्त मराठवाड्यातील पायाभूत समस्यांवर काम करणारे मानवलोक संस्थेचे संघटक सौ.कल्पना आणि अनिकेत लोहिया, द नेदरलँड येथील आधार फॉर यू संस्थेचे संस्थापक सौ.वृंदा आणि गिरीश ठाकूर ,
नगर जिल्ह्याचे भुमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक अविनाश मिसाळ, नगरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे उपस्थित राहणार असल्याची माहिती स्नेहालयाच्या अध्यक्षा जया जोगदंड यांनी दिली.
स्नेहालय मधील 18 वर्षांवरील लाभार्थी तसेच सेवाव्रती यांच्या निवासाकरिता हे 15 हजार चौरस फुटांचे सुसज्ज संकुल लोकसहभागातून उभारण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सद्यस्थितीवरील मान्यवरांचे चिंतन ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com