Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयाच्या मुलींचा संघ आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत अजिंक्य
नगर - अहमदनगर महाविद्यालयाच्या मुलींच्या फुटबॉल संघाने एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगाव येथे आयोजित आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. या प्रतिष्ठित स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण सहा संघांनी सहभाग नोंदवला होता.
अंतिम सामन्यात अहमदनगर महाविद्यालयाच्या संघाने न्यू आर्ट्स कॉलेज, अहिल्यानगर या संघाचा प्रभावी पराभव करून विजेतेपद निश्चित केले. सामन्यात प्रियंका आवारी, सोनिया डोसानी, वैष्णवी रोकडे आणि शोभा गायंधर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संघाच्या यशात निर्णायक भूमिका बजावली.
या विजयानिमित्त BPHE सोसायटीचे चेअरमन डॉ. आर. जे बार्नबस, सेक्रेटरी विशाल बार्नबस, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांनी विजयी संघाचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाला विशेष गौरव प्राप्त झाला आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com