Top News

समर्थ प्रशालेत शेष पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

 समर्थ प्रशालेत शेष पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

नगर : दर्शक  |  वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला, सावेडी विभाग, अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून




नगर : दर्शक  | 
वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला, सावेडी विभाग, अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पेमराज मारडा महाविद्यालयाच्या मा. प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष मा. अॅड. किशोरजी देशपांडे साहेब होते.



कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या माः मुख्याध्यापिका सौ. वसुधा जोशी मॅडम यांच्या प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविकातून त्यांनी प्रशालेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याबाबत सविस्तर माहिती दिली व उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशालेत स्वागत केले. या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा व अध्यक्षांचा परिचय स्नेहसंमेलन प्रतिनिधी श्री सुनील रायकर सर यांनी करून दिला.



प्रमुख पाहुण्या मा. प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित मॅडम यांनी आपल्या मनोगतात “एक पेन, एक पुस्तक, एक विद्यार्थी हा जग बदलू शकतो, ते फक्त शिक्षणामुळेच” असे सांगत विद्यार्थी फक्त परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी असावा, असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे काही प्रेरणादायी प्रसंग कथन केले. 


मराठी भाषा संशोधक केंद्राच्या समन्वयक असल्याने त्यांनी मराठी भाषेतील शब्दांची जादू विद्यार्थ्यांना उलगडून सांगितली व जीवनात भाषेचा वापर जपून करावा, असा उपदेश केला. मराठीतील प्रसिद्ध कवी प्र. के. अत्रे व बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांमधील आशय व कल्पना स्पष्ट करत “वाचनाने जीवन समृद्ध होते, म्हणून पुस्तकांशी मैत्री करा” हा मोलाचा संदेश दिला. तसेच शांतता, सर्जनशीलता व राष्ट्रभक्ती हे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी असावेत, असेही त्यांनी नमूद केले.



कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अॅड. किशोरजी देशपांडे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या विविध कला व कर्तृत्वाचा गौरव केला. प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री दीपक ओहळ सर, चेअरमन मा. श्री विकास सोनटक्के सर, सेक्रेटरी मा. श्री सुरेश क्षीरसागर सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. गुंफेकर मॅडम, सांगळे गल्ली विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री कानडे सुनील सर, पर्यवेक्षक मा. श्री कुलकर्णी एल. एम. सर, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वर्षा पाठक यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. शिल्पा कुलकर्णी मॅडम यांनी केले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने