Top News

विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी व चोरीचे तब्बल ३८ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार पकडला

सराईत गुन्हेगार पकडला विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी व चोरीचे तब्बल ३८ गुन्हे दाखल 

सराईत गुन्हेगार पकडला विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी व चोरीचे तब्बल ३८ गुन्हे दाखल




नगर : दर्शक  | 

शहरातील सावेडी परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगारास अटक करत त्याच्याकडून तब्बल १९ लाख ४२ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमेश महादेव कुंभार (वय ४९, रा. अमाप रेसिडेन्सी, कशेळी, ठाणे) असे असून तो रेकॉर्डवरील सराईत आरोपी आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ या कालावधीत फिर्यादी अशोककुमार विजयकुमार अग्रवाल (रा. बंगला क्र. ०६, विराज कॉलनी, सावेडी) हे कुटुंबासह जयपूर येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत १४ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोने, डायमंड, चांदी व रोख रक्कम चोरून नेली होती.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याच्या छडा लावण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पथकाला सदरचा गुन्हा वरील आरोपींनी केल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचत दि. १६ जानेवारी रोजी आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार आशीष शिंदे (रा. बारामती, जि. पुणे, फरार) याच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून १५ लाख ११ हजार ४७५ रुपयांच्या सोन्यासह तब्बल १९ लाख ४२ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी रमेश कुंभार याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी व चोरीचे तब्बल ३८ गुन्हे दाखल आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने