Top News

राजस्थानी मंडळाच्या हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 राजस्थानी मंडळाच्या हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राजस्थानी मंडळाच्या हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद






नगर : दर्शक 

संक्रांतीनिमित्त राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने शहरातील महेश मंगल कार्यालयात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाजातील २०० पेक्षा अधिक महिलांनी उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


        कार्यक्रमाची सुरुवात मंडळाच्या अध्यक्षा शोभा राठी, सचिव शारदा लड्डा, स्नेहलता सोमानी, आशा सोनी, अलका बलदवा, सुवर्णा नागोरी, इंदिरा बिहाणी, निर्मला बंग, स्मिता सारडा, सरस्वती झंवर, पुष्पा मणियार तसेच प्रमुख अतिथी सुनंदा सोमानी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.


      कार्यक्रमात ‘कुटुंबाचा पाया भक्कम कसा करावा’ या विषयावर हेमा सारडा यांनी केलेले मार्गदर्शन उपस्थित महिलांनी मंत्रमुग्ध होऊन ऐकले. यावेळी प्रमुख अतिथी सुनंदा सोमानी यांनी गीता परिवाराबाबत माहिती देत समाजकार्य करण्यास इच्छुक महिलांचे गीता परिवारात कार्यकर्ता म्हणून नेहमीच स्वागत असल्याचे सांगितले.


       वैष्णवी भजन मंडळाच्या शोभा लड्डा, महिलांच्या व्यवसायाला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या उज्वला मालू, प्रयास ग्रुपच्या अलका मुंदडा तसेच तरंग उपक्रमाच्या प्रमुख शामा मंत्री यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच मंडळाच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.



      नवीन वर्षात कार्यकारिणीच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास अध्यक्षा शोभा राठी व सचिव शारदा लड्डा यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका नावंदर यांनी केले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्यातून प्रेरणा     मिळाल्याच्या आणि व्याख्यानातून सकारात्मक विचार घेऊनच घरी परतत असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने