Top News

Qawwali Nagar | कव्वाली ही आत्म्याशी संवाद साधणारी सूफी कला - डॉ.कमर सुरुर

 परवेज हुसेन निजामी कव्वाल यांचा मखदुम सोसायटी तर्फे सन्मान 

Qawwali Nagar | कव्वाली ही आत्म्याशी संवाद साधणारी सूफी कला - डॉ.कमर सुरुर






नगर : दर्शक 
 कव्वाली ही केवळ गायना ची कला नसून ती सूफी विचारधारेतून जन्मलेली, माणसाच्या आत्म्याशी थेट संवाद साधणारी आध्यात्मिक परंपरा आहे.प्रेम,भक्ती, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारी कव्वाली आजही समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करत आहे, असे प्रतिपादन डॉ. कमर सुरुर यांनी केले.



हैदराबाद येथील प्रसिद्ध आणि उत्कृष्ट कव्वाल परवेझ हुसेन निजामी एका साहित्यिक आणि सांस्कृतिक सुफी कार्यक्रमासाठी आले असता अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशनच्या वतीने त्यांचा डाॅं.कमर सुरुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युनुसभाई तांबटकर, आबीद दुलेखान,सदाकत हुसैन,परवेज शेख, आरिफ सय्यद, राजुभाई शेख, जावेद मास्टर, अबरार शेख आदी मान्यवर उपस्थित होते.



डॉ.सुरुर पुढे म्हणाले की,कव्वाली ही अमीर खुसरो यांच्या परंपरेतून विकसित झालेली कला असून, तिने प्रेम, बंधुता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात कव्वाली माणसाला अंतर्मुख होण्याची संधी देते. 


परवेझ हुसेन निजामी यांसारखे कलाकार या परंपरेला जपून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य करत आहेत.अशा साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचार रुजतात, उर्दू भाषा व सूफी संस्कृतीचे संवर्धन होते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कव्वाली कलेचा आनंद घेतला.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने