चेकचा अनादर झाला म्हणुन शिक्षा
नगर : दर्शक
अहमदनगर येथील अतिरीक्त चिफ ज्युडिशियल मॅजि. जी.जी. सोनी साहेब यांनी मेहेक कनिया बजाज रा. नेप्युन को-ऑप हौसिंग सोसा. स्टेशन रोड, ओटी स्टेशन, उल्हासनगर हिस निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट कलम १३८ मध्ये ०२ महिन्याचा कारावास व ६,२०,०००/-रु. आरोपीस दंड केला. मे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्याचा कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.
सदर केसची थोडक्यात हकीगत अशी आहे की, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे असल्याने आरोपीस पैशाची गरज असल्याने रु. ५,००,०००/- फिर्यादीने आरोपीस उसनवार दिले होते. सदर रकमेपोटी आरोपीने त्याचे खात्याचा सेंट्रल बैंक ऑफ इंडीया शाखा उल्हासनगर चा चेक दि.१०.०४.२०२३ रोजीचा दिलेला होता.
तो फिर्यादी यांनी त्यांचे खाते असलेल्या बँकेत वटण्यासाठी भरला असता खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे तो न वटता परत आला. त्यामुळे फिर्यादीने मेहेक कनिया बजाज यांचे विरुध्द निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट अॅक्ट कलम १३८ प्रमाणे केस दाखल केली होती. त्याचा निकाल वरील प्रमाणे झालेला आहे.
फिर्यादी तर्फे अॅड. श्रीमती आराधना चौधरी (मोटवानी) यांनी काम पाहिले होते.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com