प्रा.विष्णू सुरासे, प्रा.अविनाश कोल्हे, प्रा.नवनाथ वाव्हाळ, देवीप्रसाद सोहोनी यांची व्याख्याने
(Photo Rutuja Ahmednagar)अहमदनगर - अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने प्रतीवर्षीप्रमाणे सोमवार दि.15 ते 18 मे 2023 या कालावधीत वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक व प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली.
या व्याख्यानमालेचे सोमवार दि.15 रोजी सायंकाळी 6.15 वा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांच्या हस्ते होईल. याच दिवशी संध्याकाळी औरंगाबाद येथील प्रा.विष्णू सुरासे यांचे ‘हास्यरंग’ हा कार्यक्रम होईल. प्रा.सुरासे यांचे आजपर्यंत 300 च्यावर ‘हास्यरंग’चे कार्यक्रम झाले आहेत. विविध वृत्तपत्रात त्यांचे विविध विषयांवर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. आजच्या तणावग्रस्त परिस्थितीत लोकांच्या चेहर्यावर हास्यरंगाच्या माध्यमातून हसू फुलविण्याचे महत्वाचे काम ते करतात.
मंगळवार दि.16 रोजी प्रा.अविनाश कोल्हे यांचे ‘मला भेटलेले साहित्यक, कलावंत’ या विषयावर व्याख्यान होईल. सेकंड इनिंग या त्यांच्या दोन दीर्घकथांच्या संग्रहाला महाराष्ट्र राज्याचे पारितोषिक मिळाले आहे. ‘पंगतीतील पान’ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे प्रा.कोल्हे यांना अभ्यास शिष्यवृत्ती मिळाली आहे.
बुधवार दि. 17 रोजी इतिहास संशोधक प्रा.नवनाथ वाव्हळ ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि नगर जिल्हा’ या विषयावर बोलतील. इतिहास आणि संस्कृती या विषयी समाज जागृतीचे काम ते करतात. नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांविषयी लोकमानसात माहिती देण्याचेा त्यांनी छंद आहे. महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट इतिहास संधोधक म्हणून प्रा.वाव्हळ यांना गौरविले आहे.
गुरुवार दि. 18 रोजी कलावंत देवीप्रसाद सोहोनी यांचा एकपात्र प्रयोग होईल. श्री.सोहोनी यांनी 28 मराठी मालिका, 5 हिंदी मालिका, 5 मराठी चित्रपट, एक हिंदी चित्रपट, 25 मराठीनाटके, 9 हिंदी नाटकांमधून विविध भुमिका साकारल्या आहेत. ‘इथेच टाका तंबू, दक्षता, लक्ष्य, जय मल्हार, शंभुराजे, खुलता कळी खुलेना, दिल दोस्ती दुनियादारी आदि 18 मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.
सर्व व्याख्याने दररोज सायंकाळी 6.15 वा. चितळे रोडवरील अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात होतील. रसिकांनी व्याख्यानमालेस उपस्थित रहावे, असे आवाहन व्याख्यानमालेच्या संयोजिका संचालिका शिल्पा रसाळ, किरण आगरवाल, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, अनंत देसाई, सहकार्यवाह डॉ.राजा ठाकूर, खजिनदार तन्वीर खान यांनी केले आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com