डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीतील डॉ.अजित लावरे व डॉ.मनोज वाघ यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
अहमदनगर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा.डॉ.अजित रामभाऊ लावरे व प्रा.डॉ.मनोज पांडूरंग वाघ यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील ‘इलेक्ट्रीकल व सिव्हील विभागाच्या अभ्यास मंडळावर निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी दिली.
डॉ.अजित रामभाऊ लावरे व डॉ.मनोज पांडूरंग वाघ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय पी. नाईक, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
या सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन, महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ. सुजय विखे पाटील, प्रभारी सेक्रेटरी जनलर डॉ.पी.एम.गायकवाड यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करुन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com