अहमदनगर- विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाच्यावतीने टेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोवेशन सेंटर, अकॅडमी ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी अँड वेस्ट वॉटर इनोव्हेशन जोहान्सबर्ग, साउथ आफ्रिका आणि कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोवेनंट युनिव्हर्सिटी ओटा नायजेरिया यांच्या संयुक्त विद्यमाने मटेरियल सायन्स या विषयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. उद्घाटनप्रसंगी डॉ. विखे पाटील फाउंडेशनचे प्रभारी सेक्रेटरी डॉ.पी. एम. गायकवाड, उपसंचालक सुनील कल्हापुरे व प्राचार्य डॉ. उदय नाईक आदि उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘मटेरियल सायन्स’ या विषयात काम करणारे संशोधक शास्त्रज्ञ व या विषयातील शैक्षणिक तज्ञ सहभागी झाले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेत ऑनलाइनच्या माध्यमातून ‘मटेरियल सायन्स’ या विषयात होत असलेल्या अत्याधुनिक संशोधना संदर्भात विविध असे एकूण सुमारे 50 शोध निबंधाचे सहा सत्रांमध्ये सादरीकरण झाले. या सहा सत्रात डॉ. प्रभू देव, डॉ. रवींद्र नवथर, डॉ. जोसेफ डेरी सो, डॉ. रविंद्र गारमोडे, डॉ. किशोर काळे, डॉ. लक्ष्मण अभंग, डॉ. अशोक मचे, डॉ. कानिफ मरकड, डॉ. श्रीमती ओलूफनमिलायो जोसेफ, डॉ. संपत देशमुख, डॉ. फिलीप बार बोला, डॉ. बी.एस. गंधारे यांचे सत्र परीक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले.
सदरील शोधनिबंध विविध 17 (सतरा) देशांमधून प्राप्त झाले होते. त्यात अल्जेरिया, चिली, चीन, फ्रान्स, भारत, इराक, मोरोक्को, नायजेरिया, ओमान, पोलंड, पोर्तुगीज, रशिया, साऊथ आफ्रिका, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स या देशांचा समावेश होतो.
‘मटेरियल सायन्स’ या विषयांमध्ये सध्या होत असलेल्या संशोधना संदर्भात आधुनिक बाबींचा ऊहापोह करण्यात आला. तर जगभरातील विविध विद्यापीठातील शैक्षणिक तज्ञ डॉ. शुभांशु पांडा (टेक्निकल डायरेक्टर होगनास इंडिया, अहमदनगर), डॉ. संदीप काळे (डायरेक्टर टेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोवेशन सेंटर इंडिया), डॉ.अजय मिश्रा (अकॅडमी ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी अँड वेस्ट वॉटर इनोवेशन्स जोहान्सबर्ग साउथ आफ्रिका),
डॉ. संडे ओयेडेपो (मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोवेनंट युनिव्हर्सिटी ओटा नायजेरिया), डॉ. के.बी. काळे (कन्व्हेनर) हे मान्यवर या आंतरराष्ट्रीय परिषदेत ऑनलाइन सहभागी झाले. तसेच यंत्र अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ.रवींद्र नवथर यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न करून ‘मटेरियल सायन्स’ या विषयाचे अभियांत्रिकीतील महत्त्व विशद करुन या परिषदेत सहभागी सर्व मान्यवरांचे आणि संशोधक तसेच या क्षेत्रातील शिक्षणतज्ञांचे आभार मानले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेस संस्थेचे चेअरमन तथा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सहभागी संशोधकांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
------
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com