नगरसेविका रुपालीताई वारे यांनी महासभेत उपस्थित केला होता प्रश्न
(Photo Vijay Mate Ahmednagar)
अहमदनगर - प्रभाग क्र.2 मधील पाईपलाईन रोडवरील वैष्णव कॉलनीमध्ये पावसाळ्यात पाण्याचे तळे साचते. जास्त पाऊस झाला तर कॉलनीतील घरात पाणी जाते. या भागातील नागरिकांना त्रास होत असल्याने तसेच प्रभागातील ओढे नाले यांची साफ सफाई होणे बाबत नगरसेविका रुपालीताई वारे यांनी मनपाच्या सभेमध्ये, महासभेत हा प्रश्न वारंवार लावून धरला होता.
या प्रश्नाची दखल मनपाचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी घेत शुक्रवारी दुपारी वैष्णव कॉलनी, भिटे मळा परिसराची पाहणी करुन वस्तूस्थिती लक्षात घेऊन परिस्थितचे गांभिर्य पाहून ओढे नाले यांच्या जवळील झालेल्या अतिक्रमणांचे सर्व्हेक्षण करून, रितसर नोटिसा बजावून ती काढा असा आदेश विभागप्रमुख सुरेश इथापे यांनी दिला.
नगरसेविका रुपालीताई वारे यांनी महासभेत हा प्रश्न उपस्थित करून तो सोडविण्याचा प्रयत्न केला या बद्दल वैष्णव कॉलनी मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे, अतिक्रमण विभागाचे सुरेश इथापे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, सचिन गोंटे, रामदास भिटे, शंकर गर्जे, जीवन क्षीरसागर, विशाल सावळे, सूर्यकांत तागड, चंद्रकांत तागड, औटी आदिंनी वैष्णव कॉलनीमधील जेथे पाणी साचते, घराघरात पाणी जाते त्या भागाची पाहणी केली.
येथील नागरिक फुलचंद जाधव, अरुण बडे, आनंद साळवी, बापुसाहेब फुंदे, प्रकाश गुलाटी, आशा गावडे, आशा माने, हरिष विधाते, दत्तातय कुलकर्णी, कौशल्या लोखंडे आदिंनी या प्रश्नात नगरसेविका रुपालीताई वारे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी तातडीने लक्ष घालून आयुक्तांना प्रत्यक्षात परिस्थिती दाखवून दिली. माजी नगरसेवक निखिल वारे यांनी सांगितले की, ओढे नाले या जवळ असलेली अतिक्रमण मनपा ने काढून टाकावी. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका होणार नाही.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com