महापद्मसेना आयोजित ‘अखंड पद्मशाली चषक २०२३’ चा विजेता ठरला श्री प्रतिष्ठान, सोलापूर संघ
अहमदनगर (प्रतिनिधी) - अखंड पद्मशाली चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमध्ये खेळाची आडव निर्माण होण्याचे काम होत असते. आनंदीमय जीवन जगण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे. या माध्यमातून आपले आरोग्य सदृढ निरोगी राहण्यास मदत होते असते. अखंड पद्मशाली चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करुन समाजाला एकत्रित आणण्याचे काम केले जाते ही बाब कौतुकास्पद आहे.
शहरामध्ये अहमदनगर पद्मशाली क्रिडा मेळावा अंतर्गत महापद्मसेना आयोजित ‘अखंड पद्मशाली चषक २०२३’ भव्य टेनिस बॉल क्रिकट स्पर्धेचे वाडिया पार्क, नगर येथे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामना रविवारी पार पडला. यामध्ये उपनगरचा राजा व श्री प्रतिष्ठान, सोलापूर यांच्यामध्ये अटीतटीचा सामना रंगला. सामनाअंती श्री प्रतिष्ठान, सोलापूरचा संघ विजेता ठरला. विजेता संघाल प्रथम पारितोषिक नगरसेवक मनोज दुलम व हॉबी टेलर्सचे संचालक त्रिलेश येनगंदुल यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मा. नगरसेवक अॅड. धनंजय जाधव, अहमदनगर फटाका असो.चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, श्री मार्कंडेय पतसंस्थेचे नारायण कोडम, प्रतीक जोशी, विनायक मच्चा, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते नारायण मंगलारप, श्री मार्कंडेय देवस्थानचे कुमार आडेप, शंकर नक्का, शिवाजी संदुपटला, राहुल ग्राफिक्सचे शुभम पासकंटी, संदिप दातरंगे, गुंडू मोबाईल बाजारचे संचालक प्रमोद गुंडू, दिपक आडेप, मुकूंद येनगंदुल, विनोद म्याना, हॉटेल रेडिअन्सचे संचालक श्रीनिवास रासकोंडा, अंकुश चत्तर, राजू म्याना, संदीप गोसाके, अवि इराबत्तीन, संजय इरमल आदि मान्यवर उपस्थित होते.
हि स्पर्धा आयपीएल प्रमाणे घेण्यात आली. यामध्ये नगरशहरातील व राज्यातील विविध संघ निवडण्यात आले होते. यामध्ये १) नित्यसेवा संघ (रवि गुडा), २) उपनगरचा राजा (अवि इराबत्तीन), ३)अखंड श्रमिकनगर (विनित बुरला), ४) गोसके आर्टस् (संदिप गोसके), ५) एस.बी. ऑटो (जयंत बोगा), ६) महाकाल वारियर्स (अभिजित यनगंदुल), ७) मंगलगेट सी.सी.( राज नागुल), ८) महामुनी मार्कंडेय भक्त (संजय इरमल, पुणे), ९) श्री प्रतिष्ठान (श्रीनिवास संगा, सोलापुर) १०) पुणे पद्मशाली वारियर्स (राजेश उपरपेल्ली, पुणे) असे या स्पर्धेमध्ये १० संघांनी प्रवेश घेतला. प्रत्येक संघाचे ४ लिग मॅचेस प्रमाणे हि स्पर्धा एकूण ७ दिवस सुरु होते. रविवारी अंतिम सामना होऊन सोलापूर येथील श्री प्रतिष्ठान संघ प्रथम विजेता तर उपविजेता उपनगरचा राजा ठरला. दररोज चार सामने झाले. प्रत्येक सामने पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पारितोषक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक - श्री प्रतिष्ठान संघ, सोलापूर (मनोज दुलम यांच्या कडु न ३१००० रु.रोख व शुभम पासकंटी यांच्याकडुन ट्रॉफी), द्वितीय पारितोषिक - उपनगरचा राजा संघ (रवि दंडी यांच्या कडून २१००० रु.रोख व प्रमोद गुंडू यांच्याकडुन ट्रॉफी), तृतीय पारितोषिक - गोसके आर्टस् ११ संघ (चतुरंग अर्थ कार्पोेरेशचे प्रतिक जोशी यांच्या कडून ११००० रु.रोख व प्रमोद गुंडू यांच्या कडुन ट्रॉफी), चतुर्थ पारितोषिक - महामुनी मार्कंडेय भक्त संघ (स्व.व्यंकटेश कुशय्या वल्लाकट्टी यांच्या स्मरणार्थ ३००० रु. रोख व शुभम पासकंटी यांच्या कडुन ट्रॉफी), मॅन ऑफ द सिरिज - हर्षद डोमकावळे (अभिषेक गुंटूक जालना यांच्या वतीने ३१०० रु. रोख व ट्राफी), उत्कृष्ठ फलंदाज - आकाश मेरगेवार, नांदेड (अभिषेक गुंटूक जालना यांच्या वतीने २१०० रु. रोख व ट्राफी), उत्कृष्ठ गोलंदाज - भास्कर पेरला, सोलापूर (अभिषेक गुंटूक जालना यांच्या वतीने २१०० रु. रोख व ट्राफी), उत्कृष्ठ झेल - अक्षय पिस्का ( स्व. नितीन जवणे स्मरणार्थ ब्रॅडेंड शुज), उत्कृष्ठ क्षेत्ररक्षन - ऋषिकेश दुडगू ( स्व. नितीन जवणे स्मरणार्थ ब्रॅडेंड शुज), फास्ट 50 - हर्षद डोमकावळे ( कै.नरसय्या बुरम यांच्या स्मरणार्थ ११०० रु. रोख) सलग ३ षटकार - किरण अंबाल व भास्कर पेरला ( कै.नरसय्या बुरम यांच्या स्मरणार्थ ५०१ रु. रोख), ओव्हर हॅट्रिक - गितेश साधुल (मुकुंद येनगंदुल ५०१ रु रोख), एस.एस. मोबाईल समूह कडून काही खेळाडूंना गिफ्ट, श्री ज्वेलर्सचे संचालक श्रीकांत मंडाल यांच्या सर्व १६० खेळाडूंना आकर्षिक भेट वस्तु देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रास्तविकात शंकर जिंदम यांनी सांगितले कि, समाजातील खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे. आणि युवक मोबाईलच्या आहारी न जाता मैदानी खेळाकडे वळावे, जेणेकरुन युवकांचा सर्वांगिण प्रगती व सुदृढ आरोग्य लाभेल, यासाठी महापद्मसेनाच्या वतीने अखंड पद्मशाली चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यता आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीनिवास येल्लाराम यांनी केले. तर आभार प्रदर्शन रवि दंडी, विनित बुरला, अमोल येनगंदुल यांनी केले.
हि स्पर्धा यशस्वीतेसाठी शंकर जिंदम, अमोल येनगंदुल, रवि दंडी, विनोद बोगा, रोहिदास बुरम, राजेंद्र इगे, उदय सुरम, विनोद बुरा, किरण वल्लाकट्टी, विनीत बुरला, अमित बिल्ला, अमोल बिज्जा, संजय बोगा, रमेश गाजुल, प्रविण शिरापुरी, दर्शन येमुल, गोविंद नामन, दिपक बुरला, निलेश गंगुल, प्रविण बुरा, अभिजीत येनगंदुल, गोपाल न्यालपेल्ली, रोहन गुंडू, गितेश सादुल, रोहित अलवाल, अक्षय दुस्सा, रोहन दोंतुल (पुणे), अमर बोडा(सोलापूर), राज नागुल, आनंद येनगंदुल, प्रणव बोगा, रमेश आकुबत्तीन, पंकज धेंड, अक्षय संभार, शुभम अंकारम, अनिकेत देशपांडे, प्रथमेश बोगा, गणेश इपलपेल्ली, रतन गोसाके, विष्णु रायपेल्ली, प्रसाद दोंता, आदित्य सादुल, नितीन सग्गम आदि विशेष परिश्रम घेतले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com