डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीच्या ई अॅण्ड टी.सी. विद्यार्थ्यांचे ‘हॅकेथॉन 2023’ प्रोजेक्ट स्पर्धेत सुयश
(Photo Vijay Mate Ahmednagar)अहमदनगर (प्रतिनिधी) - विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाच्या ई अॅण्ड टी.सी. च्या विद्यार्थ्यांनी पुणे येथे झालेल्या ‘हॅकेथॉन 2023’ प्रोजेक्ट स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. या यशाबद्दल फौंडेशनच्यावतीने विजयी संघाच्या सन्मान करण्यात आला.
पुणे येथील खराडी मध्ये टी.आय.ए.ए. या कंपनीने अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी (भारत) वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुणे विभागातील या स्पर्धेत पुणे, नगर, नाशिक येथील 46 संघातील एकूण 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पीसीसीओई, पीआयसीटी, व्हीआयटी, के.के.वाघ, सिमबायोसीस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी एसजीजीएस नांदेड व डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामधील संघ सहभागी झाले होते.
डॉ.विखे पा.अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 3 संघामध्ये तृतीय वर्ष इ अॅण्ड टी.सी. च्या भाग्यश्री बेलोटे, स्नेहल औटी, सारिका तेलोरे, स्नेहा सुरवडे, श्रृती शिंदे व राहुल भगत यांनी एसक्युएल जावा, सर्व्हलेट जावा, स्क्रीप्ट अशा विविध टेक्नॉलॉजीचा वापर करुन रेशन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम तयार केली. त्या सादरीकरणास एक्सपर्ट टिमने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली. प्रोजेक्टमध्ये सुचविलेल्या सुधारणा आणि बदल दिलेल्या वेळेत पुर्ण केले. याबद्दल टी.आय.ए.ए.च्या एक्सपर्ट टिमने या यशाचे कौतुक केले.
यासर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपसंचालक सुनिल कल्हापुरे व प्रभारी प्राचार्य डॉ.रविंद्र नवथर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अशा प्रकारच्या संधी वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यासाठी मॅनेजमेंट प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केले. त्यांच्या मेहनतीस योग्य दिशा देण्याचे कार्य इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभागप्रमुख डॉ.सौ.अनिता पाटील, प्रा.ए.आर.लांडगे, प्रा.एस.एस.मांढरे, प्रा.गणेश डहाणे तसेच ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर सुदर्शन दिवटे यांनी केले.
या यशाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पाटील, प्रभारी सेक्रेटरी जनरल डॉ.पी.एम.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com