शिवसेनेच्यावतीने मराठा पतसंस्थेच्या नूतन पदाधिकार्यांचा सत्कार
(Photo Prasad Shinde Ahmednagar)अहमदनगर (प्रतिनिधी) - शिवसेनेच्यावतीने अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक अमोल येवले, नगरसेवक विजय पठारे, युवा नेते ओमकार सातपुते, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संपुर्णताई सावंत, उपाध्यक्ष किशोर मरकड, संचालक बाळकृष्ण काळे, किसनराव पायमोडे, लक्ष्मण सोनाळे, सतीश इंगळे, द्वारकाधीश राजेभोसले, अॅड. राजेश कावरे, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड.राजाभाऊ शिर्के, नगर तालुका पतसंस्थेचे अध्यक्ष सुदाम मडके आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, इंजि.विजयकुमार ठुबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मराठा पतसंस्थेने सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. पतसंस्थेच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देत त्यांना सक्षम बनविण्यात पतसंस्थेचा मोठा वाटा आहे. संचालक मंडळाच्या दूरदृष्टीने संस्था प्रगतीपथावर आहे. नूतन संचालक हे विविध क्षेत्रात चांगले काम करणार असल्याने पतसंस्थेच्या लौकिकात आता आणखी भर पडणार आहे. सर्व नूतन पदाधिकार्यांनी संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, त्यास गरजेवेळी मदत मिळवी हा दृष्टीकोन ठेवावा. शिवसेनच्या माध्यमातून आपणास आम्ही सर्वोतोपरि सहकार्य करु, असे सांगितले.
याप्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर मरकड म्हणाले, जिल्हा मराठा पतसंस्थेच्या कार्यास अनेकांचे नेहमीच सहकार्य मिळत असते. पतसंस्थेने स्व:फायद्यापेक्षा सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. प्रत्येक घटकांची आर्थिक उन्नत्ती व्हावी, प्रगती व्हावी यासाठी विविध लाभदायी योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्याचा सर्वांचा चांगला फायदा होत असल्याचे सांगून आज शिवसेनेने आमचा जो सन्मान केला आहे, त्यामुळे आपणास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात ओमकार सातपुते यांनी नूतन पदाधिकार्यांच्या कार्याचा गौरव करुन सर्वांचे आभार मानले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com