नगर शहरात सर्वप्रथम अहमदनगर महाविद्यालयास करिअर कट्ट्या अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्सचा ‘अ’ दर्जाचे सेंटर म्हणून घोषणा
नगर - नगर शहरात सर्वप्रथम अहमदनगर महाविद्यालयास ‘अ’ दर्जाचे सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून प्राप्त झाले. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे करिअर कट्टा अंतर्गत राज्यस्तरीय बक्षीस वितरण आणि सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमाणपत्र व निधी वितरण कार्यक्रम घेण्यात आला.
त्यामध्ये महाविद्यालयास सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमाणपत्र व निधीचा धनादेश (चेक) महाविद्यालयाच्या वतीने करियर कट्ट्याचे अहिल्यानगर, जिल्हा समन्वयक (शहर) प्रा.डॉ.भागवत परकाळ (अहमदनगर महाविद्यालय अहिल्यानगर) व अहमदनगर महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ प्रशांत फुगनर यांनी स्विकारला.
या सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असणार्या सर्व सोयी सुविधा या सेंटर मार्फत उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या सुविधांचा उपयोग करून घ्यावा. तसेच करिअर कट्ट्याच्या माध्यमातून औद्योगिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांन मधून उद्योजक निर्माण व्हावे, या उद्देशाने स्टार्ट -अप कंपन्या सुरु करून स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरु करण्यासाठी प्रोत्सानात्मक निधी सेंटरला प्राप्त झाला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य .डॉ.आर .जे. बार्नबस यांनी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे संस्थापक अध्यक्ष यशवंतजी शितोळे सर यांचे आभार मानले .
महाविद्यालयच्या या यशा बद्दल उपप्राचार्य प्रा.दिलिपकुमार भालसिंग विनाअनुदान विभागाचे समन्वयक प्रा.डॉ सय्यद रज्जाक उपप्राचार्य .डॉ .नोयाल पारगे, उपप्राचार्य .डॉ प्रीतमकुमार बेदरकर, महाविद्यालयाचे प्रबंधक पीटर चक्रनारायण धन्यवाद दिले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com