आनंदधाम–अहिंसा चौक मार्गावरील वेगवान वाहतूक रोखण्यासाठी नागरिकांची मागणी
नगर : दर्शक ।
आनंदधाम परिसर ते अहिंसा चौक या दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून भरधाव वाहनांचा वेग, पादचाऱ्यांसाठी वाढता धोका आणि अपघातांची वाढती मालिका या तक्रारींमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. या रस्त्यावर पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच जैन साधू–साध्वी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता. नियमितपणे ‘रेसिंग’ करणाऱ्या तरुणांमुळे रात्री आणि पहाटे भीतीचे वातावरण निर्माण होऊन दर महिन्याला लहान–मोठे अपघात घडत होते.
या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत नागरिकांनी तातडीने गतीरोधक व सुरक्षा उपाययोजनांची मागणी महापालिकेकडे केली होती. मागणी होताच नगरसेवक अविनाश तात्या घुले यांनी तत्परतेने पाठपुरावा करत केवळ तीन दिवसांत या मार्गावर आवश्यक ते गतीरोधक बसवून समस्या मार्गी लावली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत घेतलेल्या या तातडीच्या निर्णयाचे परिसरात मोठे स्वागत करण्यात आले.
नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची जलद पूर्तता केल्याबद्दल नगरसेवक अविनाश घुले यांचा सत्कार
अमोल पोखरणा, जितू पोरवाल, संजय वखारिया, सूरज अग्रवाल, सिद्धेश फुलसौंदर, राजेश मुथा, गोविंद दरक, सुभाष राऊत, सिद्धार्थ शेलार, प्रीतम गांधी, विजय मुथा, नितीन आव्हाड, सचिन डुंगरवाल, दिनेश मुनोत, दीपक बोरा, दिलीप बोरा, पंकज गांधी, लाभेश चोपडा, सागर कायगावकर, तसेच प्रकाश गुंदेचा, दिलीप करणावत, कटारिया, संजय भंडारी, रितेश चोपडा, प्रशांत फुलसौंदर, निलेश मेहेर यांनी एकत्र येऊन नगरसेवक अविनाश तात्या घुले यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असताना अविनाश तात्या घुले यांनी तातडीने पुढाकार घेत आमची जुनाट समस्या मिटवली. तीनच दिवसांत गतीरोधक बसवून पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावला.”
या उपक्रमामुळे परिसरातील वाहतुकीचा वेग आटोक्यात येण्यास मदत होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.
.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com