श्री चैतन्य टेक्नो सीबीएससी शाळेच्या ३०७ विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवित यश
नगर : दर्शक
नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत अहिल्यानगर शहरातील श्री चैतन्य टेक्नो सीबीएससी शाळेच्या ३०७ विद्यार्थ्यांनी दणदणीत यश संपादन करत महाराष्ट्रात अव्वल मान पटकावला आहे. संपूर्ण भारतभरातील हजारो शाळांमधून विद्यार्थी या गुणवत्तापूर्ण परीक्षेसाठी सहभागी होत असतात. मात्र, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक विद्यार्थी सहभाग आणि सर्वाधिक यशाची नोंद श्री चैतन्य टेक्नो शाळेच्या नावावर झाली असून त्यामुळे अहिल्यानगर शहराचा मान उंचावला आहे.
या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांत उत्कृष्ट कामगिरी केली. गणित प्रतिभा शोध (एम.टी.एस.ओ.) – १०२ विद्यार्थी, विज्ञान प्रतिभा शोध (एस.टी.एस.ओ.) – ९५ विद्यार्थी, सामान्य ज्ञान प्रतिभा शोध (जी.टी.एस.ओ.) – २२ विद्यार्थी, इंग्रजी प्रतिभा शोध (ई.टी.एस.ओ.) – ८८ विद्यार्थी
एकूण ३०७ विद्यार्थ्यांनी प्रथम पात्रता परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली असून पुढील राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. के. एन्सी मॅडम, अकॅडमिक डीन श्री. सुमन सर, शाखा विस्तार अधिकारी श्री. शशीकुमार सर, तसेच सर्व शिक्षकवृंद आणि पालक वर्गांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या निकालातून शालेय शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांचे भक्कम मार्गदर्शन शाळेतूनच मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com