शिंदे मळा भागात पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ
Ward No 7 Nagar | नगर : दर्शक |
नगरमधील उपनगर भागांचा सर्वांगीण विकास हीच आमची प्राथमिकता असून, प्रभाग क्रमांक 7 मधील शिंदे मळा हा वेगाने विकसित होणारा परिसर आहे. येथील नागरिकांना मूलभूत सुविधा, स्वच्छ वातावरण आणि उत्तम रस्ते देणे हे आमचे कर्तव्य आहे.
शासनाच्या विविध योजना आणि स्थानिक जनप्रतिनिधींच्या प्रयत्नातून शहरातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक वस्ती सुंदर आणि सुसज्ज करण्याचा आमचा निर्धार आहे. या भागात सुरू होणारे पेव्हिंग ब्लॉकचे काम हे त्याच विकासदृष्टीचा एक मजबूत टप्पा ठरेल. प्रभागातील नागरिकांचा उत्साह आणि सहकार्य हेच आम्हाला सतत काम करण्याची ऊर्जा देत असते, असे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले.
उपनगर भागातील प्रभाग क्रमांक 7 मधील शिंदे मळा भागामध्ये नगरसेविका वंदनाताई विलासराव ताठे यांच्या निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माझी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेविका पल्लवी जाधव,
माजी नगरसेवक रवींद्र बारस्कार, मुकुंद पेहरे, अंबादास चौधरी, गिरीश शिंदे, सुरेश जाधव, शरद मदने, दिलीप काकडे, विश्वास शिंदे, प्रशांत शिंदे, वंदना जाधव, लक्ष्मी पाटकुळे, सविता मोहरे, विलास ताठे, मयूर ताठे, ब्रिजेश ताठे, अरुण शिंदे, शार्दुल फुलारी, निर्मला शिंदे, रघुनाथ धस, सोनल आकडे, विद्या साबळे, शोभा साबळे, प्रमिला लगड यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना अनिल मोहिते म्हणाले की, या प्रभागाने गेल्या काही वर्षांत विकासाची नवी ओळख निर्माण केली आहे. नवीन प्रभाग रचना झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 7 हे शहरातील सर्वात सुंदर, स्वच्छ आणि नियोजित प्रभाग म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे चित्र घडवण्यात वंदनाताई ताठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा मोठा वाटा आहे. आगामी काळातही अशाच दर्जेदार कामांमुळे प्रभागातील सुविधा अधिक सक्षम होतील. आमचा पक्ष आणि जनप्रतिनिधी विकासाबाबत कोणतीही तडजोड करणार नाहीत.
नगरसेविका वंदनाताई ताठे म्हणाल्या, प्रभाग क्रमांक पूर्वीचा 6 व नव्याने झालेल्या 7 या भागात आम्ही नंदनवन उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. नागरिकांच्या गरजा, अडचणी आणि अपेक्षा यांचा सातत्याने विचार करून निधी मागवणे, कामे मंजूर करून घेणे आणि त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करणे हे आमचे ध्येय राहिले. पेव्हिंग ब्लॉकचे हे काम पूर्ण झाल्यानंतर परिसर आणखी सुंदर, सुरक्षित आणि स्वच्छ दिसेल. विकासकामांमध्ये नागरिकांचे सहकार्य आणि पाठिंबा नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे.
शिंदे मळा परिसरातील मुख्य स्ट्रीट व आंतरिक रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे हे काम उच्च दर्जाचे ब्लॉक वापरून करण्यात येणार आहे. पावसाळ्यातील चिखल, धूळ प्रदूषण आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी हे काम महत्त्वाचे मानले जात आहे. मजबूत सब-बेस, समतल पृष्ठभाग व टिकाऊ ब्लॉक यामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारेल. या कामामुळे नागरिकांना सुखद आणि सुरक्षित पादचारी मार्ग मिळणार असून वाहतुकीलाही सुगमता येणार आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com