सरपंच संतोषअण्णा देशमुख यांच्या हत्येचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस आहे - अखंड मराठा समाज
नगर : दर्शक
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष अण्णा देशमुख यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने अखंड मराठा समाज नगरच्या वतीने त्यांचे स्मरण करून त्यांची हत्या झाली तो आजचा दिवस आमच्या जीवनातील काळा दिवस आहे,
संतोष अण्णांची हत्या करणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा व्हावी अशा भावना व्यक्त करीत सर्वांनीच स्व. संतोष आण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तसेच अहिल्यानगर अखंड मराठा समाज कायम सरपंच संतोषअण्णा देशमुख यांच्या कुटुंबा सोबत राहुन त्यांच्या न्याय हक्काच्या लढ्यात शेवटच्या क्षणापर्यंत राहील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
अहिल्यानगरच्या तपोवन रोड येथील बालघरप्रकल्प येथील निराधार मुलांना यानिमित्ताने जेवण देण्यात आले, तसेच या बालगृहातील या गरीब, गरजू, अनाथ, वंचित बालकांना आपली जबाबदारी आणि कर्तव्य समजून सर्वांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी बालकल्याण समिती सदस्या ऍड अनुराधा येवले, ऍड गजेंद्र दांगट, अशोक कुटे, शशिकांत भामरे, गोरक्षनाथ पटारे, संपूर्णताई सावंत, सुधीरभाऊ दुसुंगे, संभाजी सप्रे, डॉक्टर संदीप भुकन यांनी सरपंच स्वर्गीय संतोषआण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मराठा समाज सेवक आणि सेविका वंदनाताई निघुट,जीवनलता पोखर्णा, कोमलताई ठुबे, मीनाक्षीताई वागस्कर, निर्मलाताई पारकड, पद्मताई गांगर्डे, कांताबाई बोठे, रुक्मिणी ठोंबरे रूपाली खोसे, ऍड प्रसाद डोके डॉ.संदीप भुकन, दिलीप कोल्हे, बालघर प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड सर, नगरसेवक मदन आढाव हर्षवर्धन ठुबे, भोस सर, लोटाके दादा यांच्यासह अनेक समाज बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे शेवटी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड अनुराधा येवले यांनी केले तसेच सूत्रसंचालन अशोक कुटे सरांनी केले तर युवराज गुंड यांनी आभार मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com