Nagar Sports | राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत स्वप्नील बुलाखे याचा चमकदार विजय; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
नगर : दर्शक
गोंदिया येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत अहिल्या नगरचा स्वप्नील महादेव बुलाखे (आर्मी पब्लिक स्कूल) याने उत्कृष्ट कामगिरीची चमकदार नोंद करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. त्याच्या या यशामुळे त्याची राष्ट्रीय स्तरावरील शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा भव्य उत्साहात पार पडली. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या कठीण स्पर्धेत स्वप्नीलने दमदार पंचेस, चपळता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
स्वप्नीलच्या या उज्ज्वल कामगिरीमागे किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. निलेश शेलार, सचिव श्री. धीरज वाघमारे, नगर जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष मा. नगरसेवक नितीन शेलार, कार्याध्यक्ष श्री. सचिन मकासरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच आर्मी पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल नूतन मिश्रा मॅडम, व्हॉइस प्रिन्सिपल संगीता काटे मॅडम आणि स्पोर्ट्स टीचर सोनाली मॅडम यांनीही स्वप्नीलला प्रोत्साहन देत त्याच्या कौशल्याला योग्य दिशा दिली.
खेळाडू म्हणून स्वप्नीलच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाचा यामध्ये मोठा वाटा असल्याचे त्याच्या प्रशिक्षकांनी नमूद केले. यावेळी श्री. राजेंद्र गोरखे व श्री. कृष्णा बुलाखे यांनीही त्याचे मनापासून अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्वप्नीलच्या या यशामुळे नगरची किक बॉक्सिंग क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम झाली असून, राष्ट्रीय स्पर्धेतही तो राज्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com