वंचित बहुजन आघाडीकडून महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
नगर : दर्शक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी, अहिल्यानगर दक्षिणच्या वतीने मार्केट यार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांच्या विचारांना अभिवादन केले.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, शहराध्यक्ष हनीफ शेख, शहर महासचिव प्रवीण ओरे, युवा शहराध्यक्ष योगेश गुंजाळ, गणेश राऊत, महादेव नेटके, फैरोज पठाण, प्रतीक ठोकळ, रवींद्र शिरसाठ, संकेत शिंदे, प्रतीक जाधव, शोभाताई आल्हाट, सीमा आल्हाट, संतोष जाधव, अशोक खंडागळे, गौरव आल्हाट, रोहित आल्हाट, प्रवीण धेंडे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व वंचित घटकांना न्याय मिळावा म्हणून आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे विचार आणि त्यांच्या कार्याची दिशा आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. वंचित बहुजन आघाडी ही बाबासाहेबांच्या मिशनला समर्पित असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक परिवर्तनाचा लढा अधिक जोमाने पुढे नेणार आहे.
ते पुढे म्हणाले, देशात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विषमता टिकून असताना बाबासाहेबांचे संविधानिक संदेश अधिक महत्त्वाचे ठरतात. युवकांनी बाबासाहेबांच्या लिखाणाचा अभ्यास करून समाजाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा. समता आणि बंधुता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. जय भीम घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
-----------

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com