Shrirampur | नगरपालिकेची निवडणुक वाहत आहे धामधूमीचे वारे ! नळांना दुर्गंधीयुक्त घाण पाणी आहो कोणी तरी लक्ष द्यारे !!
श्रीरामपूर शहरातील नागरीकांची गत झाली मोठी केवीलवाणी !
Shrirampur | श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शहराच्या पुर्व आणी उत्तर भागात पंजाबी कॉलनी, दशमेशनगर,सिंधी कॉलनी, नेहरुनगर, आदर्श हौसिंग सोसायटी,काझीबाबारोड,आदर्शनगर आदी भागात पिण्याच्या पाण्याच्या नळांद्वारे गटारीचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी येत असुन या घाण पाण्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित नगर पालिका प्रशासनास अनेकवेळा तक्रारी देवूनही काहीच उपयोग होत नसल्याने तथा कोणतीच दखल घेतली जात नसल्याने संबंधित परिसरातील नागरीकांना मोठ्या समस्यांचा सामना करणे भाग पडत आहे.
हा प्रश्न केवळ आजचा नसुन वर्षानुवर्षांचा आहे, कोणत्याही नगरसेवक लोकप्रतिनिधींनी आजवर याची दखल घेतलेली नाही,केवळ मतदानापूरते पोकळ आश्वासने द्यायची आणी निवडणूक संपताच मिस्टर इंडिया व्हायचे हा त्यांचा आजवरचा इतिहास आहे.
संबंधित लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आणी नगर पालिका प्रशासन ही दखल घेत नाही अशा दुहेरी संकटाचा परिसरातील समस्त नागरीक नेहमीच सामना करताना दिसुन येत आहे.
त्यात सध्या शहरात नगर पालिका निवडणुक धामधूमीचे वारे सुरु असल्याने शहर व परिसरातील आजी, माजी, भावी नगरसेवक, नगराध्यक्ष या ज्वलंत प्रश्नी लक्ष देणार का ? असा प्रश्न त्रस्त नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.
की यावेळी देखील मतदानापूर्ते पोकळ आणी खोटे आश्वासने देवून त्यांची बोळवण करत पुन्हा मिस्टर इंडिया रिलिज होणार असल्याचे पाहणे जरी दुर्दैवी ठरणारे असले नगर पालिकेच्या निवडणुकीत योग्य वेळी योग्य संधीचा शहरातील नागरीकांनी देखील फायदा घेत योग्य उमेदवारास मतदान करत आपला हक्क बजावणे तीतकेच महत्वाचे ठरणार आहे.तरच अनेको वर्षांच्या या प्रलंबित ज्वलंत प्रश्नास वाव मिळू शकेल.
असे परिसरातील त्रस्त नागरीकांचे ठाम मत झाले असल्याचे यावेळी दिसून येत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com