जलसंधारणमधून शिक्षण विभागात पदोन्नती झाल्याबद्दल अभिनंदन; कैलास शिंदे यांचाही सन्मान
नगर : दर्शक
प्रशासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आणि नुकतेच जलसंधारण विभागातून पदोन्नती होऊन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या लेखा पडताळणी कार्यालयात लेखाधिकारी म्हणून रुजू झालेले सतिष लहाने यांचा 'शिक्षक भारती' संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्यालयात जाऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कैलास शिंदे यांची देखील पदोन्नती झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या दुहेरी सत्कार सोहळ्याने शिक्षण विभागातील चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रशासकीय अनुभवाचा शिक्षकांना फायदा होईल सतिष लहाने यांनी जलसंधारण विभागात अत्यंत उत्कृष्ट काम केले असून, आता पदोन्नतीनंतर शिक्षण विभागात त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा जिल्ह्यातील शिक्षकांना होणार आहे. शिक्षक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून लहाने साहेब सकारात्मक काम करतील, असा विश्वास शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार प्रसंगी शिक्षक भारतीचे पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर, विनाअनुदान विरोधी संघर्ष समितीच्या राज्याच्या अध्यक्षा रूपालीताई कुरूमकर, जिल्हा संघटक चंद्रशेखर हासे, श्रीगोंदा महिला तालुकाध्यक्षा रूपालीताई बोरुडे, बळिराम फरगडे, दुधाडे, विक्रम आंबरे आदींसह शिक्षक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही
सत्काराला उत्तर देताना सतिष लहाने यांनी शिक्षक भारती संघटनेचे आभार मानले. शिक्षकांचे प्रलंबित देयके, भविष्य निर्वाह निधी आणि लेखा पडताळणी संबंधित कामांना प्राधान्य देऊन ते वेळेत पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमामुळे नवनियुक्त अधिकाऱ्यांचे स्वागत तर झालेच, शिवाय शिक्षक भारती संघटनेने प्रशासनाशी सुसंवाद साधत शिक्षकांच्या हिताचा दृष्टीकोन मांडला. या उपक्रमाचे शिक्षण क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.संघटनेच्या वतीने उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे,सहसचिव राहुल कानवडे ,तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात,संपत वाळके,नानासाहेब खराडे, रूपालीताई बोरुडे,कल्पना चौधरी, मफीज इनामदार,दीपक फापाळे,गणपत धुमाळ,विजय पांडे, अमोल तळेकर,संतोष नवले,बाबासाहेब तांबे,अकील फकीर,बाबाजी लाळगे,वैभव चोथे,प्रवीण मालुंजकर,श्याम जगताप,आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com