Top News

Purnima: विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा

 Purnima: कोर्टगल्ली येथील लाड सुवर्णकार विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात त्रिपुरारी पौणिॅमा दीपोत्सव उत्साहात साजरा


Purnima: कोर्टगल्ली येथील लाड सुवर्णकार विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात त्रिपुरारी पौणिॅमा दीपोत्सव उत्साहात साजरा


      Purnima:  अहमदनगर (प्रतिनिधी)  -  कोर्टगल्ली येथील लाड सुवर्णकार समाज विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात त्रिपुरारी पौणिॅमेनिमित छाया लखारा, पलक लखारा, रिया लखारा, रिधीमा लखारा, रेणुका चव्हाण, मिताली अष्टेकर यांनी अतिशय सुंदर मनमोहक रेखीव रांगोळी काढली, श्री विठ्ठल रुक्मिणी शंकरास लोण्याचा पोशाख केला. अत्यंत मनोभावे 56 भोग प्रसाद व सबंध मंदिरात दिप लावून दीपोत्सव करून झगमगाट करण्यात आला. 


     भगवान शंकराने भयंकर अशा त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला; त्रिपुरारी सुरीच्या वधाचा विजयोत्सव म्हणून त्रिपुरारी पौणिॅमा मोठ्या थाटामाटात दीपोत्सव करून सवॅत्र साजरी केली जाते. वैकुंठ चतुथॅदशीचा  दुसरा दिवस म्हणून त्रिपुरारी पौणिॅमा; कातिॅक पौणिॅमा; देव दिपावली  दीपोत्सव नावाने साजरी करण्यात येते. त्रिपुरारी पौणिॅमाला त्रिपुर वात करून श्री शंकरा समोर दिवा लावला जातो हीच देव दिपावली.


     कोजागिरी पौर्णिमापासून दररोज सुरू असलेल्या पहाटेपासून काकड आरती पूजा आर्चा दीपोत्सव करून संपन्न झाला. सौ. छाया लखारा, सौ. संगीता कुलट या भगिनी नित्यनियमाने दररोज पहाटेच काकड आरती करून पांडुरंग चरणी आपली सेवा देत आहेत.


     ॐ भजनी मंडळातील सदस्य सौ संगीता बेरड, मंगलाताई डागवाले, सुमन दगडे, शालन राठौर, इंदुबाई सुडके, लीलाताई शहरकर, वंदना शहरकर, वनिता शहरकर, चंचलबाई बोरा आदिंनी भगिनीनी कायॅक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवली.


     या प्रसंगी प्रकाश देवळालीकर, संजय देवळालीकर, मुकुंद निफाडकर, किशोर, वैभव, यश शहरकर व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने