श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्यावतीने श्री दत्त महाराजांना 56 भोग नैवद्य दाखवुन व महाप्रसाद भंडार्याने दत्त जयंती उत्सवाची सांगता
अहमदनगर (प्रतिनिधी) - येथील दातरंगे मळा दत्त कॉलनीत श्री सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री दत्त जयंतीला श्री गुरुदत्त महाराजांची पालखीतुन मिरवणुक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत महिला डोक्यावर कलश घेवुन सहभागी झाल्या. तसेच टाळकरी, वारकरी, बॅण्ड पथक, सनई चौघडा, महिलांनी एकसारख्या साड्या परिधान करुन सहभागी झाल्या.
भक्तीमय वातावरणात ही मिरवणुक शराहत पार पाडली. तसेच 21 जोडप्यांच्या हस्ते होम हवन पुजा संपन्न झाली. रात्री 72 महिलांनी तयार केलेला 56 भोग नैवद्य दाखविण्यात आला. यावेळी परिसरातील नागरीकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी भाविकांना महाप्रसाद वाटप करुन व श्री गुरुदत्त महाराजांना 56 भोग नैवद्य देण्यात आला व शेवटी महिलांचा मंगळागौर कार्यक्रमाने या दत्त जयंती सोहळ्याची सांगता करण्यात आली.
दत्त जंयतीनिमित्त बुधवारी दातरंगे मळातील दत्त मंदिरात स.7 ते 9 महारुद्राभिषेक, स.9 ते दु. 12 वा श्री दत्त पादुका पालखी सोहळा, स.10 ते स.11.30 वा. होमहवन, दु.12.50 वा.महाआरती, दु.1 ते दु.2 वा. सत्यनारायण महापुजा, दु.1 ते दु.5 महाप्रसाद (भंडारा) व संध्या.7 दत्त जन्म सोहळा व 56 भोग नैवेद्य, रात्री 8 वा. महिलांचा मंगळागौर कार्यक्रमाने दत्त जयंतीची सांगता झाली.
गेल्या 6 दिवसापासून दत्त जयंती निमित्त प्रतिष्ठानने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावुन या सोहळ्याचे कौतुक केले. या दत्त जयंती सोहळ्याचे हे 21 वे वर्ष होते. दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा पार पडतो. यावर्षी देखील विविध उपक्रम घेण्यात आले. यात रक्तदान शिबीरामध्ये आनंदऋषीजी ब्लड बँकेच्या सहकार्याने 102 रक्तदात्यांनी रक्त संकलन करुन समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला. यावेळी दत्त जयंतीचे औचित्यसाधून पाच गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकल मा. कोठारी यांच्य हस्ते देण्यात आले.
महिलांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून दत्त जयंती निमित्ताने आर.जे.प्रसन्न रेडिओ सिटी यांचा मनोरंजन कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी डान्स स्पर्धा घेण्यात आली. तसेच आकाश डान्स स्टुडिओ व सावरा ग्रुप यांचे डान्स चे प्रयोग झाले. स्पर्धेत 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कराचीवाला प्रस्तुत लहान बालकांसाठी जादुचे प्रयोग कार्यक्रम घेण्यात आला.
तसेच हरीहरेश्वर भजन संध्या कार्यक्रम मोठ्या भक्तीभावने पार पडला. तसेच दत्त जयंतीच्या दिवशी रात्री महिलांचा मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी होता. यामध्ये महिलांनी विविध कला सादर केल्या. सर्व कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. महाप्रसादाचा सुमारे 5 ते 6 हजार भाविकांनी लाभ घेतला.
दत्त जयंती उत्सावा निमित्त दत्त कॉलनी मध्ये आकर्षक साजवाट करण्यात आली. मंडप, विद्युत रोषणाई, श्री गुरुदत्त मंदिरास आकर्षक असे सजावट केल्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण तयार झाले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान व निलांबरी महिला मेेंडळ तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या दत्त जयंती उत्सवाचे प्रत्येक कार्यकम किरण कोडम यांनी गुगलमिटवर व फेसबुकरवर लाईव्ह दाखविण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com