Top News

Sant Jagnade: श्री संत जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत - शिवाजीराव कराळे

   अहमदनगर (प्रतिनिधी) - श्री संत जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या शिकवणीप्रमाणे संतांच्या विचारांवर समाजाची वाटचाल सुरु आहे.  समाजाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे. 

 नवीन पिढीने हाच आध्यात्मिक वारसा पुढे चालवावा व समाजात योगदान द्यावे. समाजातील तरुणांना योग्य दिशा मिळावे, मार्गदर्शन मिळावे यासाठी सुरु असलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक शिवाजीराव चव्हाण यांनी केले.

     थोर संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सावेडी येथील  भिस्तबाग चौक या ठिकाणी सावेडी उपनगर तेली समाजाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक शिवाजीराव चव्हाण,

 भाजपाचे सतीश शिंदे, गणेश धारक, प्रमोद डोळसे, रावसाहेब देशपांडे, वैभव शिंदे, योगेश भागवत, संतोष बोडके, ज्ञानेश्वर काळे, विजय काळे, अरविंद वालझाडे, विजय दळवी, कृष्णकांत साळुंखे, रमेश साळुंखे, नानासाहेब जाधव, कानिफनाथ शेंदुरकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी सतीश शिंदे, गणेश धारक, प्रमोद डोळसे यांनी मनोगातून संत जगनाडे महाराजांचे कार्य उपस्थितांनपुढे मांडले. यावेळी उपस्थित नागरिकांना पेढे भरविण्यात आले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने