भाजपाच्यावतीने अटल बिहारी वाजपेयी जन्म शताब्दी संपन्न
यावेळी सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा,पंडित वाघमारे,व्यापारी आघाडी अध्यक्ष महेश गुगळे,संयोजक नीरज राठोड,आघाडी पदाधिकारी हर्षल बोरा,सुरेश लालबागे, रूपेश वर्मा,प्रशांत बुऱ्हाडे, लक्ष्मीकांत तिवारी, संजय कंगला, करण ढापसे, मयूर बोचूघोळ, प्रिया जाणवे,सविता कोटा,बाबासाहेब सानप,अशोक गायकवाड,सागर शिंदे,महावीर कांकरिया,हर्षल जोशी,पप्पू गर्जे इत्यादी पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आगरकर यावेळी म्हणाले कवि मनाचा परंतु वेळ प्रसंगी कणखर असे अटलजींचे व्यक्तिमत्त्व पोखरण सारख्या आणू चाचणीत आपल्या समोर आले, आजही युवकांच्या श्रद्धास्थान असलेल्या ह्या देशभक्ताला मी आदर पूर्वक नमन करतो. पंतप्रधान म्हणून अटलजींचा प्रवास इतका संस्मरणीय होता की त्याचे उदाहरण आजही दिलं जाते. लोक आजही त्यांना मनापासून आठवतात.
महेश गुगळे म्हणाले अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान पद भुषवलंय. होते.ते हिंदी कवी, पत्रकार आणि प्रखर वक्ते होते.त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकार म्हणून केली.जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या परमिट पद्धतीला विरोध करण्यासाठी मुखर्जी श्रीनगरला गेले तेव्हा त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले.भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती. ते एक भारतासाठी समर्पित व्यक्तिमत्व तर होतेच पण प्रखर देशभक्त आणि देशासाठी आपले सर्वस्व त्यांनी दिले.आजीवन अविवाहित राहून त्यांनी देशसेवा केली.आज व्यापारी आघाडीच्या वतीने त्यांना आम्ही नमन करतो असे ते म्हणाले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com