इम्पॅक्टफुल पत्रकारिता हा विकास पत्रकारितेचा गाभा आहे : डॉ किरण मोघे
नगर :
समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे समाजाला येणाऱ्या अडीअडचणींना शासन दरबारापर्यंत आपल्या बातमीद्वारे पोहोचविणे म्हणजेच इम्पॅक्टफुल पत्रकारिता हा विकास पत्रकारितेचा गाभा आहे पत्रकारितेचा सन्मान व्हावा यासाठी विकास पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नाशिक विभाग प्रभारी उपसंचालक तथा अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर किरण मोघे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक अधीस्वीकृती समिती आणि सीएसआरडी महाविद्यालय पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सीएसआरडीच्या सभागृहात विकास पत्रकारिता व पत्रकारांसाठीच्या विविध शासकीय योजना या विषयावर व्याख्यान कार्यशाळा झाली.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रामदास ढमाले होते कार्यशाळेला राज्य अधीस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, नाशिक विभाग अधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके, समितीचे सदस्य विजय सिंह होलम सीएसआरडीचे प्राध्यापक विजय संसारे यांची उपस्थिती होती तसेच नगर जिल्ह्यातील संपादक निवासी संपादक ब्युरो चीफ,जिल्हा प्रतिनिधी, उपसंपादक,कार्यकारी संपादक,विशेष प्रतिनिधी, प्रेस फोटोग्राफर,इलेक्ट्रॉनिक्स प्रतिनिधी,सीएसआरडी या महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेणारे विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना किरण मोघे म्हणाले की अधीस्वीकृती पत्रिका, विकास पत्रकारिता आणि पत्रकार कल्याण योजना अशा चार विभागांबाबत माहिती दिली पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी अधिस्वीकृती पत्रक देण्यात येते.यासाठी असणारे आवश्यक कागदपत्र याबाबत त्यांनी माहिती दिली.
ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानाने अधीस्वीकृती पत्रक देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना आम्ही अधीस्वीकृती पत्रक देतो शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी याबाबत माहिती देताना मोघे म्हणाले की या निधीच्या माध्यमातून गंभीर आजारात एक लाख पर्यंत मदत मिळते पत्नी व दोन मुलेही यामध्ये समाविष्ट असतात या योजनेचा फायदा पत्रकारांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील.
पत्रकार सन्मान योजना याबाबत सांगताना डॉ.मोघे म्हणाले की साठ वर्षे वय 30 वर्ष पत्रकारितेचा अनुभव बाय नेम कात्रणे आयकर विवरण अशी सर्व कागदपत्रे असल्यास पत्रकाराच्या कुटुंबीयांना पाच लाख मदत पत्रकाराचे अपघात झाल्यास तीन लाख, गंभीर इजा झाल्यास दोन लाख अशा स्वरूपाच्या पत्रकारांच्या कल्याणासाठी शासनामार्फत योजना राबविली जाते.
राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना कुलथे म्हणाले राज्य अधिस्वीकृतीवर काम करताना योग्य कागदपत्र असल्यास अधिस्वीकृती मिळविणे सोपे आहे, आम्ही पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
जेष्ठ पत्रकारांना सन्मानाने शासकीय सवलती आणि अधिस्वीकृती देण्यात यावी : जेष्ठ पत्रकार रामदास ढमाले
अध्यक्षीय भाषणात बोलताना जेष्ठ पत्रकार रामदास ढमाले म्हणाले या संस्थेत पत्रकारिता फक्त शिकविली जाते असं नाही तर पत्रकार घडविला जात आहे त्याबद्दल या संस्थेचे आभार पुढे बोलताना ढमाले म्हणाले की मी पुण्याहून नगरला आलो तेव्हा बार्शीकरांसोबत काम करायला मला मिळाले मला त्यानंतर लोकमतला जिल्हा प्रतिनिधी म्हणून संधी मिळाली आणि त्या काळातील पत्रकार आणि पत्रकारितेतील जिल्हा प्रतिनिधी हा पद किती महत्त्वाचा होता जणू काही जिल्हाधिकारी सारखा अनुभव पत्रकारितेत मला मिळाला.
त्यानंतर मुरलीधर शिंगोटे यांच्यासोबत पुण्यनगरीत काम केले पुण्यनगरीच्या माध्यमातून पत्रकारितेतील विविध अनुभव मिळाले आमच्या काळातील पत्रकारिता आम्हाला चांगलीच वाटते याचा अर्थ असा नाही की आजची पत्रकारिता वाईट आहे असे म्हणताच पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला पुढे बोलताना ढमाले म्हणाले की शासनाने हि समिती नेमणे यामागे उद्देश्य काय पत्रकार आणि शासन यांच्यात समन्वय ठेवून जेष्ठ पत्रकारांना सन्मानाने सर्व शासकीय सुविधा सवलती आणि अधिस्वीकृती देण्यात यावी अशी अपेक्षा समितीकडून ढमाले यांनी केली.
अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर किरण मोघे यांची भेट सीएसआरडी महाविद्यालय पत्रकारिता विभागात जर्नालिझमचे प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि प्राध्यापक
अधिस्वीकृती नियमांमध्ये आमूलाग्र बदल करणे अत्यावश्यक : सुधीर लंके
नाशिक विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके म्हणाले पत्रकारिता आणि अधिस्वीकृती याबाबत माहिती पत्रकारांना होणे यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे लंके पुढे म्हणाले की अधिस्वीकृतीची सुरुवात शासनातर्फे 1984 साली करण्यात आली त्यामुळे यात अमुलाग्र सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.
ग्रामीण पत्रकारांना यामध्ये अधिस्वीकृती देण्याबाबत सुधारणा होणे आवश्यक आहे पन्नास वय वर्ष असलेल्या पत्रकारांना सन्मानाने अधिस्वीकृती मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील राहणार अधिस्वीकृती हा पत्रकारांचा सन्मान आहे.
शासन व जिल्हा माहिती कार्यालय हे आपल्या संपर्कात येतात यासोबतच बऱ्याच सोयी सवलती औषधोपचारांबाबत सरकार शासकीय योजनांची माहिती लंके यांनी यावेळी दिली. तसेच सीएसआरडी या संस्थेने पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू केला आणि आज या कोर्सला मणिपूरचे तीन विद्यार्थी तसेच नगरचेही विद्यार्थी नवोदित पत्रकार होण्यासाठी म्हणजेच पत्रकारिता शिकण्यासाठी येत आहेत याबद्दल संस्थेचे विशेष आभार लंके यांनी मानले.
प्रास्ताविक विजयसिंह होलम यांनी करत या कार्यशाळेचा हेतू आणि उद्देश काय आणि पत्रकारांना शासकीय योजनांची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे म्हंटले या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापक सॅम्युअल वाघमारे यांनी केले तर आभार कॉम्रेड पत्रकार भैरवनाथ वाकळे यांनी मानले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com