दप्तर तपासणी फेर लेखापरीक्षणची मागणी ; अन्यथा अन्याय निवारणचा आंदोलनाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या निधीतून शासकीय कपातीच्या रक्कमेचा अपहार झालेला असताना ग्रामपंचायत निहाय दप्तर तपासणी करुन फेर लेखापरीक्षण विभागीय आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरुन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्नी कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत निहाय कामाची यादी, ती कामे पूर्ण झाल्याबाबत व त्या कामाच्या शासकीय कपातीच्या रकमेचे चलन पावत्या याची माहिती देण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आलेली आहे. पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी यांनी कर्मचारी यांच्याशी संगनमत करून शासकीय कपातीची काही ग्रामपंचायतीची रक्कम हडप केली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, विभागीय आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरून पारनेर पंचायत समिती अंतर्गत 2021 ते आज आखेर पर्यंतचे मंजूर कामे, पूर्ण झालेल्या कामाच्या शासकीय कपातीच्या रक्कमेची दप्तर तपासणी करुन करुन फेर लेखापरीक्षण विभागीय आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरुन करावे, त्यातील दोषी ग्रामविकास अधिकारी, इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com