Samajvadi Shrirampur | समाजवादी पक्षातर्फे जोएफ जमादार यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

समाजवादी शक्ती प्रदर्शनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद; ‘निवडणूक जनतेच्या हातात’ अशी जोरदार चर्चा

Samajvadi Shrirampur | समाजवादी पक्षातर्फे जोएफ जमादार यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल




श्रीरामपूर | दर्शक | प्रतिनिधी:

श्रीरामपूर नगर पालिका निवडणुकीत समाजवादी पक्षाने नगराध्यक्षपदासाठी शेख जोयेफ युनुस जमादार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण शहर अक्षरशः दणाणून गेले. ढोल-ताशांचा गजर, पटाख्यांची आतषबाजी, तर तरुण-तरुणींच्या उत्स्फूर्त घोषणा यामुळे श्रीरामपूरचा राजकीय पारा चांगलाच चढला होता.


या रॅलीमध्ये जमादारनगर–मौलाना आझाद चौक–सय्यद बाबा चौक–कर्मवीर चौक ते प्रशासकीय इमारत असा मार्ग उत्साहाने भरून गेला.

या मार्गात येणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील आदी थोर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले.

शहरातील नागरिकांच्या प्रचंड गर्दी आणी उत्स्फूर्त उत्साहने समाजवादी पक्षाच्या या उमेदवारीला जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.


प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या उपस्थितीत जोएफ जमादार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुंब्रा (मुंबई) येथील सुप्रसिद्ध रिअल स्टार नदीम खान यांची विशेष उपस्थिती रॅलीचे आकर्षण ठरली. समाजवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उसळलेला उत्साह पाहण्यासारखा होता.



जनतेनेच निवडणूक हातात घेतली” रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त संदेश


रॅलीदरम्यान सर्वसामान्य मतदार, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक आदी नागरिकांनी खुल्या मनाने जमादार यांना शुभेच्छा दिल्या. यंदाची निवडणूक जनतेच्याच हातात असल्याचा संदेश यावेळी स्पष्टपणे उमटला.


जोएफ जमादार यांचे भावनिक भाषण : “आपला प्रतिनिधी उन्मत्त नसावा… आपल्या घरातील माणूस असावा!”


उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नागरिकांसमोर बोलताना जोएफ जमादार भावुक झाले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,

“गेल्या दहा वर्षांत शहरातील समस्यांकडे कोणीच लक्ष दिले नाही. नागरिकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले गेले. आता प्रतिनिधी असा निवडला पाहिजे जो ‘आपला माणूस’ असेल, जो समस्या दाखवून द्यायच्या आधीच त्यावर काम करेल.”


ते पुढे म्हणाले की,

“लोकप्रतिनिधी उद्धट नसावा; तक्रार घेऊन येणाऱ्याला हाकलून लावणारा नसावा. उलट नागरिकांच्या समस्या आपल्या घरच्यांसारख्या समजून त्यावर तत्काळ उपाय करणारा असावा. आपला विश्वास, आशीर्वाद आणि आपले प्रेम असेच कायम राहो अशी माझी मनापासून इच्छा आहे.”


जमादार यांच्या या मनापासून केलेल्या संवादाला नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने जोरदार प्रतिसाद दिला.

जोएफ जमादार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाने श्रीरामपूरमधील निवडणूक वातावरण चांगलेच तापून प्रस्तापितांचे धाबे दणाणले गेले आहे. समाजवादी पक्षाच्या या जोरदार शक्तीप्रदर्शनामुळे शहरात चर्चेला उधाण आले असून आगामी निवडणूक रंगतदार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नेहमीच्या त्याच त्या अकार्यक्षम प्रतिनिधींना शहरातील नागरीक मोठे त्रासले गेले असुन जोएफ जमादार यांच्या रुपाने शहरातील जनतेस नवीन पर्याय उपलब्ध झाल्याने जागरुक मतदार मोठ्या अपेक्षेने श्री.जमादार यांच्या नेतृत्वाकडे आकर्षीत होताना दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या