Anandvan School | आनंदवनभुवन पूर्व प्राथमिक शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न
Anandvan School | नगर : दर्शक |
मुलांचा सर्वोतोपरी विकास होण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन इ. अतिशय उपयुक्त ठरतात असे प्रतिपादन श्रिया देशमुख यांनी केले. समर्थ प्रसारक मंडळ संचलित आनंदवनभुवन पूर्व प्राथमिक वर्गांच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीपद श्रीम श्रिया देशमुख यांनी भूषविले.
या प्रसंगी बोलताना त्यांनी २५ वर्षांपूर्वी त्यांची मुले याच शाळेत शिकत असताना झालेले वार्षिक स्नेहसंमेलने व त्यात पालक म्हणून त्यांनी शिक्षकांना केलेली मदत व त्यातून अनुभवलेली धमाल मजमस्ती या सर्व आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्यांनी गायलेली सुंदर बडबडगीतांनी मुलांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर हसू उमटविले.
याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी तसेच शालेय समिती (प्राथमिक विभाग) चेअरमन सुरेश क्षीरसागर, उपाध्यक्ष दीपक ओहोळ, चेअरमन विकास सोनटक्के, सदस्य ऍड किशोर देशपांडे, सदस्य ऍड वेद देशपांडे, सदस्य इंजि सचिन क्षीरसागर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात आकाशात फुगे सोडून व संगीत शिक्षिका सौ खणकर तसेच विद्यार्थ्यांनी गायलेल्या सुरेल स्वागतगीताने झाली.
आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थी व पालक यांना संदेश देताना मुख्याध्यापिका सौ धनश्री गुंफेकर म्हणाल्या की पुढे मोठ्या वर्गात गेल्यानंतर शाळा आणि अभ्यास हे खूप जोमाने करायला सुरुवात होते पण पूर्व प्राथमिक वर्गात असताना केलेली मजमस्ती पुढे आयुष्यभर समरणात राहते. यातूनच पुढे विद्यार्थ्यांची कला, विज्ञान अशा विविध क्षेत्रात असणारी रुची दिसून येते. नाटक, नृत्य, कला या क्षेत्रात असणारा कल लक्षात येण्याचे शालेय स्नेहसंमेलन हे माध्यम ठरू शकते यात शंकाच नाही.
संस्थेचे चेअरमन सुरेश क्षीरसागर यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजवरच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच सर्व विद्यार्थी व पालकांना स्नेहसंमेलनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अतिथींच्या व अध्यक्षांच्या हस्ते छोट्या व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात बहार आणली.
तेजस राऊत व विदिशा राऊत या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या निवेदनाने प्रेक्षकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती आनेचा व कल्याणी क्षीरसागर यांनी परिचय शुभांगी वैद्य, यादिवाचन कल्याणी क्षीरसागर व आभार शर्वरी पोळ यांनी मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com