नगर जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेत २५० खेळाडूंचा सहभाग
नगर - जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत 250 खेळाडूंनी सहभाग नोंदवत गुलाबी थंडीत धावले. तर दमदार कामगिरी करत प्राविण्य मिळवून सदर स्पर्धा गाजवली. नगर जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद, अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडीया पार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा सप्ताह निमित्त जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. सुनील जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, प्रियंका खिंडरे, जिल्हा सचिव दिनेश भालेराव, अहमदनगर ऑलम्पिक असोसिएशनचे सचिव शैलेश गवळी, महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशनचे सचिव संजय साठे, क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष राजेंद्र कोतकर आदी उपस्थित होते. मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेल्या खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करुन यश प्राप्त केले.
16 व 18 वर्ष गटातील प्रथम दोन तर 20 वर्ष व खुल्या गटातील पहिले सहा क्रमांकाचे खेळाडू अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा सचिव दिनेश भालेराव, श्रीरामसेतु आवारी, अविनाश काळे, अमित चव्हाण, विश्वेषा मिस्किन, समीर शेख, तुकाराम मरकड यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :-
16 वर्षाखालील
मुले
प्रथम- सार्थक आजबे,
द्वितीय- सर्वेश दळवी,
तृतीय- विवेक मुळे.
मुली -
प्रथम – प्रिया गुळवे ,
द्वितीय – गौरी कुलाळ ,
तृतीय -स्मितल नागपुरे.
18 वर्षाखालील
मुले
प्रथम -आयान पठाण,
द्वितीय- सम्यक राजगुरू,
तृतीय -दीपक पवार.
मुली
प्रथम- रिद्धी सप्रे,
द्वितीय- दीक्षा राजगुरू,
तृतीय- श्रुतिका भवर.
20 वर्षाखालील मुले
प्रथम- मयूर चव्हाण,
द्वितीय- कृष्णा गायके,
तृतीय- मयूर आवारे,
चतुर्थ- शंकर मरकड, पाचवा- सुरज कदम, सहावा- प्रसाद सुरवसे.
मुली प्रथम- साक्षी भंडारी, द्वितीय- ऐश्वर्या काकडे, तृतीय- किरण सांगळे,
चतुर्थ- योगिता पवार, पाचवा- शितल देवडे.
खुला गट पुरुष-
प्रथम किशोर मरकड, द्वितीय- लक्ष्मण कळमकर, तृतीय- ईश्वर झिरवाळ, चतुर्थ- आकाश शेरवाले, पाचवा- प्रतीक कलापुरे, सहावा- ज्ञानेश्वर वायकर. खुला गट महिला प्रथम- गायत्री डांगे, द्वितीय- नेहा पवार, तृतीय- कीर्ती नांगर, चतुर्थ- साक्षी मोरे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com