संयुक्ता काळे ला स्केटिंगचे गोल्ड मेडल
नगर - भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन सलग्न एम स्पोर्टस अॅकडमीच्या रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024-25 स्पर्धेत संयुक्ता सचिन काळे हिने ‘गोल्ड मेडल’ पटकवले. यापूर्वी झालेल्या स्पर्धेत तीला रौप्यपदक होते. यावेळच्या स्पर्धेत तीने गोल्ड मेडल पटकवले तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ती आयकॉन पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आहे. ती 5 ते 7 या वयोगट गटात खेळली होती. भिंगार येथे झालेल्या स्पर्धा जिल्हा रोलर संघटनेचे सहसचिव सतीष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. प्रमोद डोंगरे आणि शुभम कर्पे या टीमच्या प्रशिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
नगरसह, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. आयकॉन पब्लिक स्कुलच्या प्राचार्या दीपीका नगरवाला यांच्या हस्ते आणि वर्गशिक्षिका अनुश्री महाजन यांच्या उपस्थितीत संयुक्ता काळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com