अहमदनगर जिल्हा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
नगर - अहमदनगर जिल्हा वाचनालयाची 2023_24 साठी ची वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राध्यापक शिरीष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, खजिनदार तनवीर खान, संचालक किरण अग्रवाल, शिल्पा रसाळ, प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी ,संजय चोपडा, राहुल तांबोळी, डॉक्टर शैलेंद्र पाटणकर ,कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल उपस्थित होते.
प्रा. शिरीष मोडक यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून मागील 2023 24 या वर्षातील विविध विषयांचा आढावा घेतला. विषय पत्रिकेतील विषय सभेतील सदस्यांनी एकमताने मंजूर केले. मागील वर्षात वाचनालयावर प्रेम करणारे वाचक सभासद ,सदस्य, संचालक मंडळ, कर्मचारी यांच्या समूहिक प्रयत्नातून केलेल्या यशस्वी प्रयत्नांचा आढावा घेतला.
सावेडी जिल्हा वाचनालयाची उभारणी, दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन,या भूषणावह गोष्टि तसेच प्रस्तावित सावेडी वाचनालयाचे सुशोभीकरण , बाल वाचनालय सुरू करणे यासह अनेक विषयावर अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी उपस्थित यांना माहिती दिली.
याप्रसंगी वाचनालयाच्या वतीने वाचक सभासद , आजीव सदस्य व संचालक मंडळातील सदस्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या अतुल्य कामगिरी तसेच निवडीबद्दल पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सदस्यांनी वाचनालयाच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या सूचना मांडल्या. त्यावर लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल असे प्राध्यापक शिरीष मोडक यांनी सांगितले .
सूत्रसंचालन शिल्पा रसाळ, स्वागत किरण अग्रवाल, दिलीप पांढरे यांनी केले.आभार प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी यांनी मांडले. याप्रसंगी वाचनालयाचे आजीव सभासद विविध क्षेत्रातील मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com