अहमदनगर पहिली मंडळी सी.एन.आय.चर्चच्या वर्धापन दिन उत्साहात संपन्न
नगर- अहमदनगर पहिली मंडळी, सी.एन.आय. हातमपुरा येथील असलेल्या चर्चच्या कम्युनिटी हॉल वास्तूचा २१ वा वर्धापन दिन मोठया थाटामाटात आणि उत्साहात पार पडला. सन २००३ साली उभारलेल्या या वास्तूस २१ वर्षे पूर्ण झाल्याने विशेष भक्ती चर्चमध्ये आयोजित करण्यात आली. या विशेष भक्तीस ख्रिश्चन समाजाचे महाधर्मगुरु रा. रेव्ह. दरबारा सिंग बिशप साहेब उपस्थित होते.
तसेच नाशिक धर्मप्रांतातील कार्यकारीणी सदस्य आणि आचार्य वर्ग, बुथ हॉस्पीटल येथील प्रशासनअधिकारी देवदान कळकुंबे आणि त्यांचा परिवार, नगरसेविका सौ. रुपालीताई पारगे तसेच समाजातील इतर नामांकीत मान्यवर आणि चर्चमधील सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. विशेष भक्तीबरोबरच खिश्चन समाजाचा पवित्र प्रभुभोजन विधी नगर विभागातील आचार्यांच्या हस्ते भक्तीभावाने पार पडला.
या विशेष भक्तीप्रसंगी मा.रा.रेव्ह. दरबारा सिंग बिशप साहेब यांनी बायबलच्या वचनातून उपस्थित सभासदांना मार्मीक आणि बोधपर प्रवचन केले. आपल्या प्रवचनातून त्यांनी असे म्हटले की, पाण्याचे बाष्पीभवन होउन त्याची वाफ होते. आणि ती वर अंतराळात जाते आणि अखिल सृष्टीवर परमेश्वर पर्जन्यवृष्टीचा वर्षाव करतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण परमेश्वराची आराधना मनोभावे करतो तेव्हा ती आराधना आणि स्तूती परमेश्वरापर्यंत वर पोहोचते आणि त्या स्तूती आणि आराधनेचे प्रतिफळ म्हणजेच आपल्याला परमेश्वराचे भरभरुन आशिर्वाद प्राप्त होतात. आपल्या प्रवचनातून त्यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
रेव्ह. राजकुमारी सिंग, प्रा.पी.आर. गायकवाड, प्राचार्या श्रीमती जाधव मॅडम, अहमदनगर पहिली मंडळी डी-१८ कॉग्रीगेशन चर्च तसेच विविध मान्यवरांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या. भक्ती झाल्यानंतर चर्च परिसरात मान्यवरांचा सत्कार चर्च कमिटीतर्फे करण्यात आला. केक कापण्यात आला. त्या प्रसंगी फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. आणि हवेत फुगे सोडण्यात आले. सत्कार झाल्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि सभासदांकरीता प्रितीभोजनाचे नियोजन करण्यात आले.
हा सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता चर्चचे धर्मगुरु रेव्ह अभिजीत तुपसुदरे, सचिव सतिश मिसाळ, उपसचिव प्रितम जाधव, खजिनदार डॉ. संजय लाड, उपखजिनदार सॅम्युएल बोर्डे, कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रसन्ना शिंदे, प्रा. विनीत गायकवाड, श्री रविद्रं लोंढे, सुनित ढगे, अमोल लोंढे, कुमार हर्षल पाटोळे, सौ. शोभना गायकवाड, सौ. वंदना शिंदे, सौ. कांदबरी सुर्यवंशी, सौ. शशिकला साळुंके, श्रीमती स्नेहल साळवे या कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चचा तरुण संघाने घेतले. महिला मंडळ, चर्च सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com