रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
नगर- जीवनामध्ये स्पर्धा अपरिहार्य आहे, स्पर्धा आपण टाळू शकत नाही. ससा आणि कासवाच्या गोष्टीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्व विशद केले. त्याचबरोबर अपयशाने खचुन न जाता परिश्रम घेत रहावेत असे विशद केले. महात्मा गांधीनी बालपणी पाहिलेल्या राज्य हरिश्चंद्र या नाटकातून मिळालेल्या प्रेरणेविषयी सांगितले. मोबाईलच्या अतिरेकी वापरापासून दूर रहाण्याचा सल्ला दिला. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला.
रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनपाचे आयुक्त यशवंत डांगे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या खजिनदार अॅड दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, संस्था सदस्य अँड माधवेश्वरी म्हसे मॅडम, राज्य क्रीडा मार्गदर्शक जानेश्वर खुरांगे, प्राचार्य पोकळे सर, उपप्राचार्य पा. वांडेकर सर, पर्यवेक्षक म्हस्के सर, सातपुते सर, दारकुंडे मॅडम, शिक्षक प्रतिनिधी अनंत कुलकर्णी, विद्यार्थी प्रतिनिधी चि. युवराज भळगट, क. खेडकर श्रावणी, क. हिंदवी टेमकर, श्रेयस वाघुले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्य क्रीडा मार्गदर्शक जानेश्वर खुरांगे म्हणाले की, शालेय जीवनातील आवडता दिवस म्हणजे स्नेहसंमेलनाचा दिवस, आवडता तास म्हणजे खेळाचा तास असतो. शासनातर्फे आपल्या जिल्हात १३ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. खेळाडूंसाठी २५ मार्क, शासकीय नौकऱ्यांमध्ये राखिव जागा अशा सवलती मिळतात. विद्यार्थ्यांनी आवडीचा खेळ जोपासावा, असे सांगितले
अध्यक्षीय मनोगत अॅड विश्वासराव आठरे पाटील म्हणाले की, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी 'मी कसा घडली हे आचार्य अत्रे यांचे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला. आचार्य अरे आणि जयकर यांच्यातील नाते कसे होते है उलगडून सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उपयोजित ज्ञान दयाव. विदयार्थ्यांच व्यक्तिमत्व है वर्गखोल्या बारोबरच क्रीडांगणावर घडत असते. विविध क्षेत्रांमध्ये योगदान देणारे विद्यार्थी शाळा महाविद्यालयांमधून घडावेत. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्याकरता ध्येय निश्वित करावे असा मोलाचा सल्ला देखिल दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा संचालक बळीराम सातपुते यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका व्ही. एस. दारकुंडे यांनी करून दिली. विद्यालय प्रगतीचा अहवाल वाचन शिक्षीका प्रतिनिधी श्रीम. वंदना राऊत यांनी केले.
सूत्रसंचालन गावडे एस. एस., अमृते पी. एम., . चौधरी डी.डी., श्रीम. लबडे ए. जी. यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डी.सी.म्हस्के यांनी मानले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com