शब्दगंध ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
नगर - सर्व सभासद साहित्यिकांनी महाराष्ट्रभरातील नवोदित साहित्यिकांना शब्दगंध सोबत जोडून घेण्यासाठी प्रयत्न करावेत,नवोदितांच्या लिहित्या हाताला प्रेरणा देण्यासाठी शब्दगंध सातत्याने प्रयत्नशील राहील, सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन त्यासाठी एक पर्वणी असेल*, असे प्रतिपादन शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद,संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस ॲड सुभाष लांडे पाटील,प्राचार्य जी.पी. ढाकणे, ज्ञानदेव पांडुळे, प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे,प्रा.मधुसूदन मुळे, संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष डॉ.अशोक कानडे, कार्यवाह सुभाष सोनवणे, खजिनदार भगवान राऊत,डॉ.तुकाराम गोंदकर, शाहीर भारत गाडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात झाली.यावेळी सर्वांचे स्वागत करून प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड यांनी प्रास्ताविक केले. सभेत आजपर्यंत च्या जमा खर्चास व नवीन सभासदास मंजुरी देण्यात आली.शाखा विस्तार,सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन, वाडमय पुरस्कार परीक्षण समिती, राज्य कार्यकारी मंडळ सदस्य निवड या विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच नव्याने लिहिणाऱ्यांना द्विवार्षिक सभासदत्व देण्याचे ठरले.संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष निवडीसाठी तसेच निधी संकलनासाठी समिती निवडण्यात आली.
'पदाधिकाऱ्यांनी निधी संकलनासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून सभासद वाढवणे गरजेचे आहे 'असे मत बारामती येथील सदस्य प्रा. हनुमंत माने यांनी व्यक्त केले.
यावेळी सचिन चव्हाण,पाथर्डी, क्रांती करंजगीकर,गुहा,विशाल मोहोळ,चांदुर बाजार, डॉ.राजेंद्र गवळी, भेंडा, सुजाता रासकर, श्रीगोंदा, रितेश सरोदे, आष्टी यांना राज्यस्तरीय प्रेम काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
डॉ.अनिल गर्जे,नवनाथ वाळके, राजेंद्र चोभे,रामदास कोतकर, बाळासाहेब शेंदुरकर, ऋता ठाकूर, डॉ.संजय दवंगे, बबनराव गिरी, सुरेखा घोलप, शर्मिला गोसावी, अरुण आहेर,सरोज अल्हाट, ऋता ठाकूर, हर्षल आगळे डॉ. रमेश वाघमारे,मारुती सावंत,वर्षा भोईटे,सुवर्णलता गायकवाड यांनी चर्चेत सहभागी होऊन निर्णय घेतले.
शेवटी कार्याध्यक्ष डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंधच्या पदाधिकाऱ्यांसह हर्षली गिरी, सुमेध ब्राह्मणे, आरती गिरी, शर्मिला रणधीर यांनी विशेष परिश्रम घेतले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com